पुणे : पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त राजेश पाटील यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी आयुक्त पदाची सूत्रे शेखर सिंह हाती घेणार आहेत.
राजेश पाटील यांनी फेब्रुवारी २०२१ मध्ये पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्तपदी रूजू झाले होते. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत देखील त्यांनी शहराची जबाबदारी घेत चांगली कामगिरी पार पाडली होती. पिंपरी-चिंचवड शहरातील अनेक महत्वाचे निर्णय त्यांनी घेतले होते.तसेच पाटील यांनी पिंपरी-चिंचवड महानगर पालिकेने तृतीयपंथीना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यानी विशेष प्रयत्न केला होता. कार्यतत्पर असणारे आयुक्त म्हणून त्यांनी ओळख झाली होती.
दरम्यान, माजी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या मर्जीतले राजेश पाटील भाजप आमदार आणि पदाधिकाऱ्यांचं म्हणणं ऐकून घेत नव्हते. तसेच शहरातील रस्त्यालगतचं अतिक्रमण हटवले, त्यावेळी सर्व पक्षीय लोकप्रतिनिधी आयुक्तांकडे कारवाई थांबविण्यासाठी आग्रह करत होते. मात्र त्यांनी एका ही लोकप्रतिनिधीला जुमानले नव्हते. अखेर सत्तांतर झाल्याने त्यांची बदली करण्यात आली आहे.