दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : इंदापूर शहरातील शिवश्री छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवरील पुरातन चिंचेचे झाड बेकायदेशीररित्या इंदापूर नगरपालिकेने तोडल्यामुळे असंख्य चित्रबलाक मृत पावले,त्या मृत पक्षांना निसर्गप्रेमी इंदापूरकरांनी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली.
रविवारी (दि.१८ जून) रोजी सकाळी अकरा वाजता इंदापूर शहरातील निसर्गप्रेमी, पक्षी मित्र घटनास्थळी जमले. (Indapur News) ज्येष्ठ नागरिक, पत्रकार माणिक गायकवाड यांनी जमीनदोस्त झालेल्या चिंचेच्या पुष्पहार अर्पण करण्यात आला.
माजी नगराध्यक्ष अलका ताटे, प्राध्यापक कृष्णा ताटे, जयंत नायकुडे, शिवाजी मखरे, हनुमंत कांबळे, हमीद आत्तार, गफूर सय्यद, प्रशांत सिताप, तानाजी धोत्रे, महादेव चव्हाण, सुनिल सोनवणे आदींनी वृक्षाला पुष्प अर्पण करून तिसरा दिवस म्हणजे सावडण्याचा कार्यक्रम केला. (Indapur News)
मुख्याधिकारी रामराजे कापरे यांना निलंबित करण्याची मागणी
मुख्याधिकारी रामराजे कापरे यांच्यावर चित्रबलाक व अन्य प्राण्यांची झाड पडताना हत्या केल्या प्रकरणी गुन्हे दाखल करून, तात्काळ निलंबित करण्यात यावे (Indapur News) अशी मागणी इंदापूर नागरी संघर्ष समितीचे प्रा. कृष्णा ताटे यांनी केली.
राष्ट्र सेवा दलाचे गफूर सय्यद म्हणाले, छत्रपती मालोजीराजे यांच्या गढीवर चित्रबलाक माता प्रजननासाठी येत आहेत. या माहेरवासिनींना मारण्याचे पाप इंदापूर नगरपालिका प्रशासनाने केले आहे.(Indapur News)
यावेळी प्रशांत सिताप, तानाजी धोत्रे, शिवाजी मखरे, हनुमंत कांबळे, महादेव चव्हाण, प्रवीण पवार आदींनी भावपूर्ण मनोगत व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आज (रविवारी) इंदापुरात विकासकामांचे भूमिपूजन