युनूस तांबोळी
Monsoon News शिरूर : मान्सुनपुर्व पाऊस आणि वळीवाची हुलकावणी त्यातून मान्सून लांबणीवर गेल्याने पुणे जिल्ह्यात पेरणीपुर्व मशागतीची कामे खोळंबली आहेत. (Monsoon News) बिपोरजॅाय चक्रीवादळामुळे चार दिवसापसून वातावरणात बदल झाला आहे. (Monsoon News) जून महिण्याची १९ तारिख आली तरी मान्सूनचे आगमन नसल्याने शेतकऱ्यांच्या नजरा आकाशाकडे लागल्या आहेत. (Monsoon News) शेतजमीन पाऊसाच्या सरीच्या आगमनाची चातका प्रमाणे वाट पाहू लागली आहे. (Monsoon News) ऐन मृग नक्षत्रात उन्हाचा चटका लागत असून मातीचा धुराळा उडत असल्याचे चित्र आहे. (Monsoon News)
पुणे जिल्ह्यात खरीप हंगामात पाऊस होणे गरजेचे असते. धरणांच्या पाणीसाठ्यामुळे काही भागांना शेतीसाठी पाण्याची उपलब्धता होत असते. पण आता धरणांनी देखील तळ गाठला असून पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे. पाणी पुरवठा योजनेतून पाणी सोडण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत आहे. काही ठिकाणी पिण्याच्या पाणी सोडले जाणार नसल्याच्या सूचना येऊ लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याची बचत करून वापरण्याचे आवाहन दिले जाऊ लागले आहे.
फळबागा व नगदी पिकांची लागवड झाल्याने त्यातून शेती व्यवसाय भरभराटीला आलेला पहावयास मिळतो. शेतीला शेती पूरक व्यवसायाची जोड असल्याने पशुपालन, कुकूटपालन तसेच इतर पाळीव प्राण्यांचा व्यवसाय केला जातो. मात्र पाऊस न झाल्याने पेरणीपूर्व माशागतीची कामे खोळंबल्याचे दिसून येत आहे. पावसाने दडी मारल्याने शेतकरी चिंतेत आहे.
वळीव कोसळल्यानंतर शेतकरी खते विस्कटणे, रोटर अथवा फणपाळी मारून पेरणीपूर्व मशागतीची कामे उरकतो. पण या वर्षी कुठेतरी एखादा पाऊस सोडला तर वळीव देखील झाला नाही. परीणामी नांगरटीची ढेकळे देखील फुटली नाहीत. त्यामुळे फणपाळी मारताना शेतकऱ्यांना अडचणी येत आहेत. उन्हाळी पावसाने हुलकावणी दिली असताना मान्सून लांबणीवर गेला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत.
खरिपात वाटाणा, बटाटा, घेवडा, आले, सोयाबीनही मुख्य पिके केली जातात. या नगदी पिकांना मोठे भांडवल लागते. मुख्य बाजरी चे पिक घेण्याकडे शेतकरी या हंगामात प्रयत्न करतो. पाऊसच न झाल्याने शेतकरी शेतात पेरणीचे धाडस करताना दिसत नाही. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी ऊस लागवडीचे धाडस केले आहे. परंतु, उगवण क्षमता 50 टक्के पर्यंत घसरली आहे. त्यातच या वर्षी पाऊस कमी असून ओढ देण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
बाजारपेठेत शुकशुकाट…
खरीपाच्या सुरवातीला पाऊस लांबणीवर गेल्याने शतेमजूर बसून आहेत. कृषी सेवा केंद्रात खते बियाण्यांच्या दुकानातही शुकशुकाट दिसून येत आहे. ग्रामिण भागातील बाजारपेठेत ग्राहक फिरकत नसल्याने बाजारपेठेतील अर्थकारण मंदावले आहे. वैरण संपल्यामुळे चाऱ्याचा तुटवडा भासू लागला आहे. पशुपालकांना मका, मुरघास जादा दराने विकत घ्यावे लागत आहे. ऊस सूकू लागला आहे. पाण्याच्या शोधात कुपनलीका घेण्यासाठी बोअरवेल मशीनची घरघर ऐकू येऊ लागली आहे. शेतकरी पाऊसाच्या प्रतिक्षेत असल्याचे माजी पंचायत समिती सदस्या अरूणा घोडे यांनी सांगितले.
दुबारपेरणीचे संकट ओढवून घेऊ नका…
मान्सूनपुर्व पावसाने हुलकावणी दिली असून चक्रीवादळामुळे वातावरणात बदल झाला आहे. काही ठिकाणी तुरळक पाऊस झाला असला तरी देखील शेतकऱ्यांनी ७५ ते १०० मिलीमिटर पाऊस झाल्यावरच पेरणी करावी. असे आवाहन कृषी पर्यवयेक्ष ए. बी. जोरी यांनी केले आहे. पावसाने दिलेली हुलकावणी यामुळे शेतकऱ्यांनी कृषी विभागाच्या सल्ल्यानूसार पेरणी करावी. शेतीत साधारण ४ ते ५ इंच एवढ्या पावसाची नोंद झाली पाहिजे. अन्यथा दुबार पेरणीचे संकट शेतकऱ्यांसमोर उभे राहिल. असेही जोरी यांनी सांगितले आहे.