जिवन शेंडकर
Farmer News : बोरीभडक, (दौंड) : खडकवासला मुळा मुठा कॅनॉल आणि बेबी कॅनॉलचे पाणी अचानक बंद झाल्याने दौंड तालुक्यातील बोरीभडक परिसर आणि पंचक्रोशीतील शेती पाण्याअभावी अडचणीत आली आहे. शेतकऱ्यांनी केलेल्या पालेभाज्या आणि इतर तरकारी पिकांना पाणीपुरवठा होत नसल्याने पिके जळू लागली आहेत. त्यामुळे शेतात असलेली पिके कशी जगवायची असा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा राहिला आहे. (Farmer News)
जून महिन्यातील पंधरवडा संपला तरी पावसाने हजेरी लावलेली नाही. त्यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे. पाऊस नसल्याने विहिरी व कूपननलिका कोरड्या पडू लागल्या आहेत. त्यामुळे आहे हि शेतीतील पिके जळण्याच्या मार्गावर आली असून पाणी टंचाई जाणवू लागली आहे. महिन्याच्या सुरुवातीला पाऊस पडेल, या आशेवर शेतकरी होते. मात्र, गेल्या आठ – दिवसांपासून सुसायट्याचा वारा सुटत असून मोकळेच ढग पळत आहेत. त्यामुळे शेतकरी चिंतातूर झाले आहेत. (Farmer News)
रोजच दिवसभर उकाडा होऊन वातावरणात बदल होतो, मात्र हुलकावणीमुळे शेतकरी चिंतातूर झाला आहे. अर्धा जून महिना उलटला तरीही पावसाचे दमदार आगमन होत नसल्याने परिसरातील पेरण्या लांबणीवर जाण्याची भीती शेतकऱ्यांकडून व्यक करण्यात येत आहे. तसेच खडकवासला मुळा मुठा कॅनॉल आणि बेबी कॅनॉलचे पाणी अचानक बंद झाल्याने शेतीतून मिळणाऱ्या उत्पन्नावर आधारित असलेल्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. (Farmer News)
दरम्यान, दौंडचे आमदार अँड. राहुल कुल, माजी आमदार रमेश थोरात यांनी लक्ष घालून त्वरित पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी करित आहेत. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता त्यांच्याशी फोन बंद असल्यामुळे संपर्क होऊ शकत नाही. (Farmer News)