लोणी काळभोर, (पुणे) : गावठी हातभट्टी दारु व्यवसायाच्या आधारे लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत दहशत माजविणाऱ्या सराईत दोन गुन्हेगारांना प्रत्येकी अमरावती व नागपुर कारागृह येथे एक वर्षा करीता स्थानबध्द करण्यात आले आहे. अशी माहिती लोणी काळभोर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी दिली आहे. (Loni Kalbhor News)
संजय नेहरु राठोड, (वय ४५, रा. काळेशिवार, शिंदवणे, ता. हवेली,) विवेक बबलु यादव (वय ३६, रा. रामदरा रोड, बल्लाळवस्ती, ता. हवेली) अशी स्थानबद्ध करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून यातील संजय राठोड यास अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे तर विवेक यादव याला नागपुर मध्यवर्ती कारागृहात एक वर्षासाठी स्थानबध्द करण्यात आले आहे. (Loni Kalbhor News)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,
संजय राठोड व विवेक यादव हे प्रतिबंधक कारवाईस न जुमानता सातत्याने हातभट्टी गावठी दारू तयार करुन विक्रीचा व्यवसाय आणि त्यायोगे सार्वजनिक सुव्यवस्थेत बाधक असलेली कृत्ये करत होते. तसेच सर्व सामान्य नागरीकांना धमकी देणे, शिवीगाळ करणे, वेळप्रसंगी मारहाण करुन आपली जबरदस्त दहशत निर्माण करणे अशा विघातक कृत्यांमुळे व गुंडगिरीमुळे लोकांचे मनात असुरक्षिततेची भावना निर्माण झालेली आहे अशी महिती पोलिसांना मिळाली होती. (Loni Kalbhor News)
सदर माहितीच्या अनुशंगाने पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण यांनी सदर गुन्हेगारावर एम पी डी ए कायदयान्वये स्थानबध्द करणे बाबतचा प्रस्ताव तयार करुन पोलीस आयुक्त, पुणे शहर यांचेकडे पाठविला असता पोलीस आयुक्त रितेश कुमार यांनी संजय राठोड यास अमरावती मध्यवर्ती कारागृह येथे व विवेक यादव यास नागपुर मध्यवर्ती कारागृह येथे एक वर्षे कालावधीकरीता स्थानबध्द करणे बाबतचे आदेश पारीत केले आहेत. (Loni Kalbhor News)
सदरची कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय चव्हाण, पोलीस निरीक्षक, (गुन्हे) सुभाष काळे, पोलीस उपनिरीक्षक किरण धायगुडे, पोलीस हवालदार गणेश सातपुते, पोलीस नाईक संदिप धनवटे, पोलीस नाईक भोसले यांनी केली आहे. (Loni Kalbhor News)