युनूस तांबोळी
Shirur News : शिरुर : शिरूर तालुक्यातील वडनेर खुर्द येथील कुकडीनदीवरील असणाऱ्या कोल्हापूर पद्धतीच्या बंधाऱ्यावरील ढापे चोरून नेणार्यांना ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे पोलीसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडून पोलीसांनी टेम्पो व जिप ताब्यात घेतली.
शिरूर पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल
याबाबत वडनेर खुर्द येथील नाथा शंकर निचीत यांनी शिरूर पोलिस स्टेशनला फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनीवार ( ता. 17 ) रात्री 02.30वा. चे सुमारास मौजे वडनेर खुर्द ( ता. शिरूर ) गावचया हद्दीत माझे घराजवळ आरोपी गोरक्षनाथ अंबादास गोंडे ( वय 45 वर्ष ) राहणार पाटपिंप्री, पोस्ट बारागाव पिंप्री, ता.सिन्नरजि.नाशिक (आयशर टेम्पो ड्रायव्हर, संजय यादव, प्रकाश धोंडीबा गावडे रा. तुगा ( ता. आंबेगाव ) जिल्हा पुणे (पिकअप ड्रायव्हर),अजयकुमार दुखी मौर्य रा. अॅट ऑफ हिल मुंबई सध्या राहणार सिन्नर,( ता. सिन्नर ) जिल्हा नाशिक, विरेंद्रकुमार केसरीप्रसाद सोनी राहणर सिन्नर, ( . सिन्नर )जिल्हा नाशिक यांनी आयशर टेम्पो नं. एम. एच. 15 डी.के. 0545 व पिकअप जीप नं. एम.एच.14जे. एल. 2915 यामध्ये घराजवळील कुकडी नदीवरील कोल्हापुर पध्दतीचे (Shirur News) बंधा-याचे ढापे काढुन ठेवलेल्या 132 ढाप्यांपैकी 62 लोखंडी ढापे अंदाजे किंमत 5,27,000/- रूपये किंमतीचे माझे संमतीशिवाय, लबाडीचे इरादयाने, चाकुचा धाक दाखवुन जीवे मारण्याची धमकी देवुन, जबरीने दरोडा टाकुन चोरून नेले. त्यानंतर ग्रामस्थांच्या सतर्कतेमुळे जांबूत पंचतळे येथे ही दोन्ही वाहने पकडण्यात यश आले आहे.
पोलिसांनी संबधीत वाहने जप्त केली असून संबधीतांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये 5,27,000/-रूपये किंमतीचे कोल्हापुर पध्दतीचे बंधा-याला लावण्याचे एकुण 62 लोखंडी ढापे, प्रत्येक ढापा किं. रू8500/- रू. किंमतीचा आहे. 8,00,000/- किंमतीचा आयशर कंपनीचा टेम्पो नं. एम. एच. 15.डी.के.0545, 5,00,000/-रुपये किंमतीचा पिकअप जीप नं. एम. एच. 14 जे. एल. 2915 एकुण 18,27,000/ माल जप्त करण्यात आला आहे.(Shirur News) पुढील तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक अमोल पन्हाळकर करीत आहे.
गेल्या वर्षी देखील टाकळी हाजी ( ता. शिरूर ) येथील साबळेवाडी बंधारा येथून ढापे चोरीला गेले आहेत. शिंगवे व वडगाव कांदळी येथून बंधाऱ्यावरील ढापे चोरीला गेले आहे. वडनेर खुर्द येथील घटनेची माहिती मिळताच संबधीत अधिकारी कनिष्ट अभियंता सुनील दाते यांना पोलिस स्टेशनला पाठविण्यात आले आहेत.(Shirur News) मागील काळात ढापे चोरीला गेल्याच्या घटना लक्षात घेऊन याबाबतच पाठपूरावा करणार आहोत. कुकडी प्रकल्प अंतर्गत घोडनदी, कुकडी नदी, मिना नदीवर ढापे चोरीच्या घटना घडत असून यामागे मोठी टोळी असण्याची शक्यता आहे. त्यासाठी पोलिस खात्याने देखील कठोर कारवाई करावी.
– प्रशांत कडूसकर,
कार्यकारी अभियंता
कुकडी पाटबंधारे विभाग क्रमांक १
नारायणगाव
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : पशुखाद्याच्या दरात मोठी वाढ शेतकऱ्याचे अर्थकारण बिघडले