Pune News : पुणे: प्रादेशिक परिवहन कार्यालयातील (आरटीओ) त्याआधारे नऊ वाहनांना बनावट योग्यता प्रमाणपत्र दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ही घटना गेल्या वर्षी नोव्हेंबर महिन्यात घडली होती.
महिला वाहन निरीक्षकाने दिली फिर्याद
याबाबत एका महिला वाहन निरीक्षकाने फिर्याद दिली आहे.आरटीओ निरीक्षकांच्या तपासणीत ही बाब उघडकीस आली आहे. याप्रकरणी बंडगार्डन पोलिस ठाण्यात एका व्यक्तीविरुद्ध (Pune News) माहिती तंत्रज्ञान कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरटीओकडून दररोज शेकडो वाहनांना योग्यता प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी स्वतंत्र संगणकीय प्रणाली आहे. वाहन निरीक्षकांना सिटिझन पोर्टलच्या माध्यमातून ते प्रमाणपत्र द्यावे लागते. हे पोर्टल सुरू करण्यासाठी दररोज सकाळी संबंधित वाहन निरीक्षकांना लॉगिन करावे लागते. त्यानंतर दिवसभर कामकाज सुरू राहते. दरम्यान, संगणकीय प्रणालीत प्रवेश (लॉगिन) केल्यानंतर पासवर्ड संबंधितांच्या मोबाईल क्रमांकावरच येतो. पासवर्ड टाकल्यानंतर सिटिझन पोर्टल कार्यान्वित होते.
तक्रारदार वाहन निरीक्षकांचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड घेऊन आरोपीने सिटिझन पोर्टल कार्यान्वित केले. नऊ वाहनांना योग्यता प्रमाणपत्र परस्पर दिले. वाहन निरीक्षकांकडून याबाबतची नोंद ठेवण्यात येते. त्याची पडताळणी नियमित केली जाते. तक्रारदार वाहन निरीक्षकांनी पाहणी केल्यानंतर त्यांच्या लक्षात हा प्रकार आला. (Pune News) त्यांनी याबाबत पोलिसांकडे तक्रार केली. पोलिसांनी याबाबत आरटीओतील अधिकार्यांकडे विचारणा केली. तेव्हा वाहन निरीक्षकांसाठी स्वतंत्र कक्ष नाही. आरटीओ कार्यालयातील एका कक्षात कामकाज चालते. हे कामकाज सुरू असताना संबंधित वाहन निरीक्षक महिलेचा लॉगिन आयडी आणि पासवर्ड मिळवून फसवणूक केल्याचे सांगण्यात आले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : नोकर भरती ! पुणे महापालिकेत तिसऱ्यांदा होणार मेगा पदभरती…
Pune News : पुणे हादरले! वारज्यात भरदिवसा तरुणावर गोळीबार
Pune News : पुण्यातील भोरमधील नेकलेस पॉईंटजवळ भरधाव पिकअप पलटी; 7 मजूर जखमी