राहुलकुमार अवचट
Yavat News : यवत : ‘वारकऱ्यांच्या वेशभूषेतील लहान मुले, पालखी मिरवणूक आणि विठू नामाचा गजर’, अशा विठ्ठलमय वातावरणात यवत येथील मोरया एज्युकेशन सोसायटी संचलित यवत हेरिटेज स्कूलच्या बाल-गोपाळांनी पायामध्ये स्केटिंग घालून पारंपारिक पद्धतीला जोड देत आधुनिक पद्धतीने अनोखा नयनरम्य रिंगण सोहळा साजरा केला. विठ्ठल-रखुमाई, संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, वासुदेव व अन्य संतांच्या वेशभूषा केलेले विद्यार्थी रिंगण सोहळयात आकर्षण ठरले.
चिमुकल्यांची पालखी दिंडी
यंदा प्रथमच यवत येथील यवत हेरिटेज इंग्लिश मिडीयम स्कूलच्या वतीने जगद्गुरु संतश्रेष्ठ श्री तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचा मुक्काम असलेल्या श्री काळभैरवनाथ मंदिरामध्ये चिमुकल्यांची पालखी दिंडी सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते.
शाळेतील सर्व चिमुकल्यांनी यावेळी वारकऱ्यांचे पोशाख परिधान केले होते. कोणी विठोबा कोणी रुक्मिणी तर कोणी तुकाराम बनले होते. यवत धान्य बाजार ते श्री काळभैरवनाथ मंदिर असा पालखी सोहळा पार पड़ताच पंढरपुरच्या वारीप्रमाणेच रिंगण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते पारंपारिक पद्धतीने होणाऱ्या (Yavat News) रिंगण सोहळ्याला आधुनिक पद्धतीचा जोड देत ३ व ४ वर्षाच्या चिमुकल्यांनी पायामध्ये स्केटिंग घालून रिंगण सोहळा साजरा केला यावेळी मुलांच्या हातात भगवे झेंडे तर मुलींच्या डोक्यावर तूळशी वृंदावन हे बघून जणू हे सर्व बालगोपाळ खरच पंढरपुरच्या वारीला निघाल्याचा भास होत होता.
एरवी शाळेच्या गणवेशात असलेले लहान मुलं मुली आज मात्र पांढरा झब्बा, डोक्यावर टोपी, कपाळी बुक्का, गळ्यात टाळ आणि नऊवारीत आलेल्या मुली, केसात गजरा, (Yavat News) डोक्यावर तुळस आणि विठ्ठल नामाची शाळा भरली, शाळा शिकताना तहान भूक हरली’ या अभंगाप्रमाणे विठ्ठल रखुमाईच्या भक्तीत दंग झालेले बाल वारकरी यवत नगरीत अवतरले. यावेळी ज्ञानाच्या मंदिरात भोळ्या विठ्ठलाच्या हरिनामाचा गजर झाला. अन अवघी शाळा दिंडी सोहळ्याच्या भक्तीरसात तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले.
यावेळी विठ्ठल (श्लोक क्षीरसागर,वय ३), रुक्मिणी (शर्वरी दोरगे ,वय ३) तर संत तुकाराम (राजवीर घिगे ,वय ५) यांच्या चेहऱ्यावरील आकर्षक हावभाव व वेशभूषेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले
‘जय जय राम कृष्ण हरी ,रूप पाहता लोचनी सुख झाले हो साजणी, ज्ञानोबा माऊली तुकाराम’ या अभंगांचे गायन करून टाळ व वीणा यांच्या तालावर ठेका धरत नृत्य तसेच विठ्ठल फुगडी खेळून प्रत्यक्षात श्रीक्षेत्र पंढरपुरातील भक्तिमय वातावरण मंदिरात निर्माण झाले.
बालगोपाळांनी पारंपारिक वारकरी वेशभूषा, तुळशी व भगवाध्वज घेऊन अभंगाच्या ठेक्यावर नृत्य व फुगडीचा आनंद घेऊन या नयनरम्य सोहळ्यात आपली भक्ती अभिव्यक्त केली. (Yavat News) रिंगण आटोपल्यावर टाळ मृदुंगाच्या गजरात पालकांच्या विठुरायाची आरती करून प्रसादाचे व खाऊचे वाटप करण्यात आले.
पसायदानाने पालखी सोहळ्याचा समारोप करण्यात आला या कार्यक्रमाचे नियोजन शाळेच्या मुख्याध्यापिका सोनल मिस , संचालक रोहन दोरगे, प्रतिभा रोहन दोरगे यांच्यावतीने करण्यात आले होते. यावेळी नर्सरी, एल.के.जी, यु.के.जी चे सर्व विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते उपस्थित होते.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Yavat News : तुकोबांच्या पालखीत फक्कड लावणी अन् भक्तीगीतांचा अनोखा मिलाफ…