Agriculture Day मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांनी कृषी क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान दिले आहे. (Agriculture Day) त्यांचे हे योगदान पाहता एक जुलै हा राज्य कृषी दिन म्हणून साजरा करण्याबाबतचा निर्णय शासनाने घेतला आहे. Agriculture Dayहा दिवस साजरा करण्यासाठी पंचायत समितींना 10 हजार तर जिल्हा परिषद मुख्यालयात कृषी दिन साजरा करण्यासाठी 20 हजार दिले जाणार आहेत. (Agriculture Day)
वसंतराव नाईक हे सलग अकरा वर्षे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहिले होते. त्यांनी त्यांच्या पदाच्या कार्यकाळात अनेक मोठे निर्णय घेतले. त्यांचे कृषी क्षेत्रातही महत्त्वाचे योगदान होते. त्यात शेतकरी हा कारखानदार व्हायला हवा, असे त्यांना प्रकर्षाने वाटत असायचे. त्यांनी शेतीला उद्योगधंद्याची जोड दिली. शेती फायदेशीर व्यवसाय ठरू शकतो हे त्यांनी दाखवून दिले. त्यांनी शेतीसाठी अनेक योजना आखल्या आणि कार्यान्वित केल्या. त्यांचे हे सर्व योगदान लक्षात घेता सरकारने हा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
कृषीदिन दरवर्षी होणार साजरा
एक जुलै हा दिवस महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त कृषी दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्यात येणार आहे. यासाठी कायमस्वरूपीची मान्यता राज्य सरकारकडून देण्यात येत आहे.
कृषी आयुक्तांनी मार्गदर्शक सूचना द्याव्यात
दरम्यान, राज्याच्या कृषी आयुक्त यांनी कृषी दिन साजरा करण्याबाबत मार्गदर्शक सूचना संबंधितांना द्याव्यात, असे शासनाने सांगितले. कृषी आयुक्तांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांतील बाबींवर खर्च करण्याच्या सूचना देखील देण्यात आल्या आहेत.