PMPML News : पुणे : पीएमपी’ची सणस मैदानजवळ उभी केलेली बस अज्ञात चोरट्याने पळवून नेल्याची घटना घडली आहे. चोरट्याने ही बस मार्केट यार्ड बस डेपोजवळ सोडून पाच हजार रुपयांची बॅटरी घेऊन चोर फरार झाला आहे. सणस मैदान ते मार्केट यार्ड बस डेपो या रस्त्यावर हा प्रकार घडला आहे. (PMPML News)
या प्रकरणी ‘पीएमपी’च्या स्वारगेट डेपोचे सुरक्षाधिकारी सुरेश सोनवणे (वय ५७) यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. (PMPML News)
मिळालेल्या माहितीनुसार, स्वारगेट आगारातून धावणाऱ्या बस फेऱ्या संपल्यानंतर पूलगेट येथील महात्मा गांधी बस आगारात उभ्या केल्या जातात. काही बस स्वारगेट परिसरात लावण्यात येतात. पालखी सोहळ्यामुळे पूलगेट येथील आगारात बस लावण्यास जागा नसल्याने चालकाने मंगळवारी रात्री बस सारसबागे जवळील सणस मैदानाजवळ उभी केली. (PMPML News)
चालक गडबडीत चावी काढून घ्यायला विसरला. ही आयती संधी साधून चोरट्याने बस पळवली. मार्केट यार्डाजवळ पोहोचल्यानंतर चोरट्याने बस तेथे सोडली आणि पाच हजार रुपयांची बॅटरी पळवली. जाताना त्याने इतर बसच्या काचा फोडून नुकसान केले. बस चोरीला गेल्याचे बुधवारी (ता. १४) लक्षात आल्यानंतर शोध घेण्यात आला. तेव्हा ती मार्केट यार्ड आगाराजवळ लावल्याचे आढळून आले. (PMPML News)
‘पीएमपी’ची सणस मैदानजवळ उभी केलेली बस चोरीला गेल्याच्या प्रकारानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आहे. या घटनेची गंभीर दखल घेऊन बस पार्किंगच्या ठिकाणी सुरक्षा वाढविण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याशिवाय चावीशिवाय बस चालूच होणार नाही, अशी यंत्रणा राबविण्याची सूचना ‘पीएमपी’चे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी दिले आहेत. (PMPML News)
दरम्यान, असाच प्रकार दोन महिन्यांपूर्वी भोसरीत घडल्याने ‘पीएमपी’ अध्यक्षांनी तातडीने पार्किंग परिसरातील सुरक्षा वाढविण्याचे आदेश दिले आहेत. (PMPML News)