Weather : हवेशिवाय जीवन कसे असेल याचा विचार करणेही अशक्य वाटते ना? हवा असेल तरच जीवन आहे. म्हणूनच जागतिक पवन दिनाचे महत्त्व अबाधित आहे. जगभरात आज (ता. १५ जून) जागतिक पवन दिवस साजरा केला जातो. याला वर्ल्ड विंड डे असेही संबोधले जाते. या वर्षीच्या जागतिक पवन दिन २०२३ ची थीम The Wind In Mind आहे. जाणून घेऊया काय आहे या दिवसाचे महत्त्व…
जागतिक पवन ऊर्जा परिषदेद्वारे हा दिवस पाळला जातो
पवन ऊर्जा आणि त्याचे फायदे याबद्दल लोकांना जागरुक करणे आणि त्यातून होणाऱ्या फायद्यांचे कौतुक करणे यासाठी जागतिक पवन दिन साजरा केला जातो. पवन दिन पाळण्याची सुरुवात २००७ पासून झाली. तर २००९ साली त्याचे नामकरण जागतिक पवन दिन असे झाले. युरोपियन विंड एनर्जी असोसिएशनने २००७ मध्ये प्रथमच हा सण साजरा केला, नंतर तो जागतिक पवन ऊर्जा परिषदेच्या सहकार्याने विविध (Weather) कार्यक्रमांद्वारे जागतिक स्तरावर साजरा करण्यात आला. विंडयुरोप आणि जागतिक पवन ऊर्जा परिषदेद्वारे हा दिवस पाळला जातो. या दिवशी जगभरात विविध कार्यक्रमांद्वारे नैसर्गिक ऊर्जेच्या या स्वरूपाचे महत्त्व समजावून सांगितले जाते.या दिवशी लोकांना स्वच्छ हवेचे महत्त्व सांगितले जाईल, असे दोन्ही संस्थांनी ठरवले. या दिवशी वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करण्यासाठी लोकांना जागरूक केले जाते.
पवन ऊर्जा आणि त्याचा उपयोग याबद्दल नागरिकांमध्ये जागरूकता वाढवणे, हा या दिवसाचा उद्देश आहे. पवन ऊर्जेचे महत्त्व आणि ते जग कसे सुधारू शकते, यासाठी हा दिवस जगभरात साजरा केला जातो. (Weather) आजही जगभरातील शास्त्रज्ञ इतर अनेक ग्रहांवर हवा शोधत आहेत. जागतिक पवन दिनानिमित्त ७५ हून अधिक देशांमध्ये कार्यक्रम आयोजित केले जातात.
जागतिक पवन दिनाचे महत्त्व काय आहे?
– या दिवशी जगभरात पवन ऊर्जेचा दैनंदिन जीवनात वापर करणे, वातावरणातील कार्बनचे प्रमाण कमी करणे आणि पवन ऊर्जा उत्पादन क्षेत्रात रोजगाराला चालना देणे यासंबंधी कार्यक्रमांचे आयोजन करून माहिती दिली जाते.
– पवन ऊर्जेचा वापर आणि त्यातून मिळणारे फायदे सांगितले जातात.
– पवन उर्जा, तिची शक्ती आणि तिच्यामुळे जग बदलण्याच्या असलेल्या शक्यता याबद्दल यादिवशी लोकांना सांगण्यात येते.
– हवा हा उर्जेचे असा स्त्रोत आहे, जो कधीच संपणार नाही; म्हणून आपण हवेचे महत्व जाणून घेऊन हवेवर चालत असलेल्या संसाधनांची निर्मिती करण्याकडे विशेष भर दिला पाहिजे.
– हवेमुळेच कार्बनचे उत्सर्जन कमी होते. याने अशा वस्तू ज्याने पर्यावरणाचा घात होईल, जसे की डिझेल आणि पेट्रोल यांच्यावर आपणास अवलंबून राहण्याची आवश्यकता भासत नसते.