Pune News पुणे : मान्सूनच्या आगमनाची आस राज्यातील शेतकऱ्याला लागून राहिली आहे. सात जूनला येणार मान्सून 11 जूनला राज्यात आला. मात्र तो रत्नागिरीतच अडखळल्याने राज्यभरातील त्याचा प्रवास सध्या थांबला आहे.
आगामी पाच दिवस विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला. (Pune News) दरम्यान, बिपरजॉय चक्रीवादळ गुरुवारी गुजरात किनारपट्टीवर धडकणार असल्याने अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे.
मान्सून 11 जून रोजी राज्यात आला. मात्र, त्याचा मुक्काम अजूनही रत्नागिरी, कोप्पल, पुट्टुपर्थी, श्रीहरिकोटा येथेच आहे. तो थोडाही पुढे सरकलेला नाही. (Pune News) त्याउलट मान्सूनची दुसरी शाखा बंगालच्या उपसागरामार्गे पश्चिम बंगालमध्ये सक्रिय झाली असून, त्या भागात प्रगती करीत आहे. देशाच्या पूर्व भागासह गुजरातमध्ये जोरदार पाऊस सुरू असून, बिहारमध्ये मात्र उष्णतेची लाट कायम आहे.
विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा
आगामी पाच दिवस विदर्भाला उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला असून, तेथे कमाल तापमान 42 ते 44 अंशांवर राहील, असा अंदाज हवामान विभागाने दिला. (Pune News) विदर्भासह छत्तीसगड, ओडिशा, आंध्र प्रदेश, येमेन, झारखंड, पूर्व मध्य प्रदेश, पूर्व उत्तर प्रदेश या भागांनाही उष्णतेच्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर जनावरांच्या वाहतूकीसंदर्भातील नियमांचे पालन करण्याचे आवाहन