Pachgani News : पाचगणी : दांडेघर – गोडवली रस्त्यावर मोठा उतार असल्याने अपघाताची शक्यता नाकारता येणार नाही. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी प्राथमिक शाळा व मालवीज फॅक्टरीसमोर तातडीने गतिरोधक तयार करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. (pachgani-news Demand for creation of Speed Breakers on Dandeghar – Godvali road)
मोठा उतार असल्याने दुर्घटना घडण्याची शक्यता
दांडेघर खिंडीतून वळसा घालून आल्यानंतर मोठा उतार असल्याने वाहनेही भरधाव वेगाने येत असतात.रस्त्याच्या बाजूला जॅम फॅक्टरी व प्राथमिक शाळा असल्याने भरधाव येणाऱ्या वाहनांमुळे मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.(Pachgani News) त्यामुळे या रस्त्यावर गतिरोधक बसवावे अशी मागणी ग्रामस्थ व पालकवर्गाची आहे.गतिरोधक नसल्याने पालकांच्या चिंतेत भर पडली आहे.
रस्ता चांगला झाल्याने वाहने सुसाट वेगाने धावत असतात.सुरुर – पोलादपूर राज्य मार्गावर जाण्यासाठी जवळचा मार्ग असल्याने नेहमी वाहनधारक या रस्त्याचा वापर करतात. (Pachgani News) गोडवली,खिंगर,राजपुरी आदी गावातील पुणे – मुंबई किंवा वाईहून येणारी अथवा जाणारी वाहणे पाचगणीत न जाता या रस्त्यावरुन ये- जा करतात.त्यामूळे या रस्त्यावर वाहनांची नेहमी वर्दळ असते.पालकांच्या व ग्रामस्थांच्या रोषाला सामोरे जाण्याआधी संबंधित विभागाने गांभीर्याने दखल घेऊन त्यावर उपाययोजना करणे गरजेचे आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pachgani News : नरवीर तानाजी मालुसरे यांचे भव्य स्मारक उभे रहाणार
Pachgani news : पाचगणी येथील टेबल लॅंन्ड पठारावरील एका घोड्याला दयामरण…