Baramati News : बारामती, (पुणे) : वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्याच्या हद्दीत कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडलेला एका अनोळखी ६० ते ६५ वर्ष वयोगटातील व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळून आला आहे. हि घटना भोंडवेवाडी (ता. बारामती) येथे मंगळवारी (ता. १३) हि घटना उघडकीस आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. (A person’s body was found mutilated by dogs; Incidents in Baramati Taluka..)
अन्नपाणी न मिळाल्याने मृत्यू झाला असावा
मिळालेल्या माहितीनुसार, भोंडवेवाडी गावच्या हद्दीत बाळू नामक मेंढपाळ त्याच्या मेंढ्या चारत असताना त्यास कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह आढळून आला. (Baramati News) मेंढपाळाने तात्काळ याची माहिती भोंडवेवाडी गावच्या पोलीस पाटील प्रज्ञा कैलास भोसले यांना दिली. भोसले यांनी याबाबत वडगाव निंबाळकर पोलीस ठाण्यात खबर दिली.
त्यानुसार पोलीस उपनिरीक्षक सलीम शेख आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी जात पाहणी केली. पाहणी केली असता त्यांना अंदाजे ६० ते ६५ वयाच्या पुरुषाचा मृतदेह आढळून आला. (Baramati News) सदरचा मृतदेह पूर्णतः सडलेल्या अवस्थेत होता. मृतदेहावर कातडी उरलेली नव्हती. केवळ हाडाचा सांगाडा होता. या मृतदेहाचे कुत्र्यांनी अक्षरश: लचके तोडलेले होते.
दरम्यान, अन्न-पाणी न मिळाल्याने हा मृत्यू झाला असावा, अशी शक्यता वर्तवली जात आहे.(Baramati News) याबाबत वडगाव निंबाळकर पोलिस ठाण्यात पोलिस पाटील प्रज्ञा भोसले यांनी फिर्याद दिली. पोलिसांनी मृतदेहाचे शवविच्छेदन करत त्यावर अंत्यसंस्कार केले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीत रेकॉर्डवरील गुन्हेगाराचा वाढदिवस साजरा करणे पडले महागात
Baramati News : बारामतीत शेतकऱ्याने तहसील कार्यालयाच्या आवारात घेतले पेटवून; जाणून घ्या कारण