Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : उरुळी कांचन येथील व्यावसायिक व माजी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य संतोष आबासाहेब कांचन यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीच्या २४ व्या वर्धापन दिनानिमित्त २४ टन हिरवा चारा श्री क्षेत्रपाल प्रतिष्ठान गोशाला लोणीकंद येथील गोशाळेतील जनावरांना मोफत दिला आहे. (Free 24 tonnes of wet fodder to Goshala on the occasion of NCP’s 24th anniversary at Uruli Kanchan.)
लोणीकंद येथील गोशाळेला दिला चारा
वाढता उन्हाळ्यात चारा तसेच पाण्याची टंचाई जाणवत आहे. अशा वेळी संतोष कांचन यांनी दाखविलेल्या माणुसकीचे पंचक्रोशीत कौतुक होत आहे.
यावेळी आबासाहेब पाटीलबुवा कांचन, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष दिलीप वाल्हेकर, उरुळी कांचनचे माजी सरपंच दत्तात्रय कांचन, माजी उपसरपंच सुनील कांचन, रामभाऊ तुपे, (Uruli Kanchan News) ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब कांचन, मिलिंद जगताप, बाबासाहेब चौधरी, लक्ष्मण कांचन, सुदर्शन कांचन, दादा जरड, राजेंद्र चौधरी, संतोष जाधव, योगेश कांचन आदी उपस्थित होते.
उरुळी कांचन विविध विकास कार्यकारी सहकारी सोसायटीचे संस्थापक आबासाहेब कांचन यांच्या परिवाराच्या वतीने चक्रधर उद्योग समूहाच्या माध्यमातून उद्योजक संजय कांचन तसेच राष्ट्रवादीचे पुणे माजी जिल्हा नियोजन मंडळाचे सदस्य संतोष कांचन यांच्या परिवाराकडून आजपर्यंत ग्रामपंचायतीच्या अत्यावश्यक सेवेला स्वखर्चाने मदत केली आहे.
दरम्यान, उरुळीत ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना- नाणी पार्क, कचरा वाहतुकीसाठी घंटागाडी, पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्यात आला आहे. उरुळी कांचन सारख्या शहराची वाढती (Uruli Kanchan News) लोकसंख्या लक्षात घेता वैकुंठ रथाची आवश्यकता भासल्याने कांचन परिवाराने ही सेवाही उपलब्ध करून दिली आहे. टंचाईच्या काळात जनावरांची भूक भागण्यास मोठी मदत झाल्याने उरुळी कांचनसह परिसरात कौतुक केले जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Uruli Kanchan News : भवरापूर ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी जानकू सातव बिनविरोध..
Uruli Kanchan News : कोरेगाव मूळ येथील अमर एज्युकेशन इनस्टीटयूटचे विद्यार्थी शंभर नंबरी..