Big Breaking : मुंबई : राजकीय वर्तुळातून खळबळजनक बातमी समोर आली आहे. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. सौरभ पिंपळकर नावाच्या ट्विटर अकाऊंटवर ही धमकी दिली आहे. या धमकीनंतर खासदार सुप्रिया सुळे यांनी मुंबई पोलिस आयुक्तांकडे तक्रार केली आहे. (You will soon become Dabholkar, Sharad Pawar is threatened to kill)
ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकी
पवार यांना ट्विटरच्या माध्यमातून जिवे मारण्याची धमकीची माहिती मिळताच राष्ट्रवादीचे शिष्टमंडळ मुंबई पोलीस आयुक्तांच्या भेटीला गेले आहे. खासदार सुप्रिया सुळे यांच्या (Big Breaking ) नेतृत्वात शिष्टमंडळ भेटीसाठी पोहोचलं आहे. जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडलवर कारवाई करावी या मागणीसाठी शिष्टमंडळ पोलीस आयुक्त कार्यालयात दाखल झाले आहे. खासदार सुप्रिया सुळे राष्ट्रवादीच्या शिष्टमंडळासह काही वेळात मुंबई पोलीस आयुक्तांच्या कार्यालयात पोहोचल्या आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Big Breaking News : मालगाडीला धडकून कोरोमंडल एक्सप्रेसचा अपघात; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती