Social Media : कोंढवा, (पुणे) : राजकारणात व केंद्र सरकारच्या विविध योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सोशल मीडिया असल्याचे प्रतिपादन अन्न प्रक्रिया उद्योग केंद्रीय राज्यमंत्री प्रल्हादसिंह पटेल यांनी केले आहे. (Social Media)
संजय टंडन यांची प्रमुख उपस्थिती..
भारतीय जनता पार्टी पुरंदर- हवेली विधानसभा मतदारसंघाच्या वतीने आयोजित सोशल मीडिया बैठकीचे आयोजन कोंढवा येथील एका कार्यालयात करण्यात आले होते. यावेळी पटेल बोलत होते. यावेळी हिमाचलचे भारतीय जनता पक्षाचे प्रभारी संजय टंडन यांची प्रमुख उपस्थिती होती. (Social Media)
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष गणेश भेगडे, सरचिटणीस अविनाश मोटे, प्रा. राम शिंदे, बारामती येथील सोशल मिडियाचे प्रमुख श्रीकांत थिटे, मारुती किंडरे, डॉ. तेजस्विनी गोळे, स्नेहल दगडे, धनंजय कामठे, सचिन हांडे, पंडित मोडक, संदीप हरपळे, राजेंद्र भिंताडे तसेच भाजपाचे प्रमुख पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते. (Social Media)
यापुढे बोलताना पटेल म्हणाले, “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने नऊ वर्षाच्या यशस्वी कार्यकाळात सेवा सुशासन आणि गरीब कल्याणासाठी घालवला आहे. यामुळे गरिबांना सुरक्षा प्राप्त होऊन त्यामुळे ते देशाच्या विकासाला गती देऊ शकले आहेत. देशातले सर्वात मोठे लसीकरण अभियान, २२० करोड नागरिकांना मोफत लसीकरण, ३५ करोड पेक्षा जास्त नागरिकांना मोफत पक्की घरे, देण्यात आली आहेत. (Social Media)
दरम्यान, ग्रामीण भागात १०० टक्के शौचालयांची निर्मिती, घरोघरी नळ कनेक्शन, ९.६ करोड परिवाराला मोफत गॅस कनेक्शन, मोफत रेशन, सुविधा जन-धन योजना (पीएमजेडीवाई), जन-धन से जन सुरक्षा, प्रधानमंत्री जीवन ज्योती बीमा योजना (पीएमजेजेबीवाई), प्रधानमंत्री सुरक्षा बीमा योजना (पीएमएसबीवाई), अटल पेंशन योजना (एपीवाई), प्रधानमंत्री मुद्रा योजना, स्टैंड अप इंडिया योजना, प्रधानमंत्री जय वंदे योजना या सारख्या केंद्र सरकारच्या विविध योजना अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचविण्याचे सर्वोत्तम माध्यम म्हणजे सोशल मीडिया असल्याचे पटेल यांनी आवर्जून पुन्हा पुन्हा सांगितले. प्रास्ताविक जालींदर कामठे यांनी केले तर आभार धनंजय कामठे यांनी मानले. (Social Media)
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Yavat News : कार्यकर्त्यांच्या पाठबळावर भाजपा दौंड तालुक्यात उभारी घेत आहे : आमदार राहुल कुल
Political | भाजपाकडून राजकीय घात झाला आहे हे आता एकनाथ शिंदे यांना कळून चुकलंय : आमदार अमोल मिटकरी