लोणी काळभोर, (पुणे): मी कुख्यात गुंड आप्पा लोंढे आहे, मला पैसे मागतो काय, असे म्हणत, तीन जनाच्या टाळक्यांनी उरुळी कांचन येथील एका पाणीपुरी विक्रेत्याला लाकडी बांबूने मारहाण करून शिवीगाळ केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस नुकताच उघडकीस आला आहे. हि घटना शनिवारी (ता. १४) सायंकाळी चार वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
याप्रकरणी पाणीपुरी विक्रेता अनिल सुरेश राठोड (वय-३२, रा. बगाडे मळा, उरुळी कांचन, ता. हवेली, मूळ रा. ग्राम रामपुरा पोस्ट रामपुरा तहसील माधवगड जि जालौल राज्य उत्तरप्रदेश ) यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी वैभव तरंगे (रा. दत्तवाडी, उरुळी कांचन, तुषार अनिल अडागळे, प्रताप बाळु लोंढे (दोघेही रा. गोळेवस्ती उरुळी कांचन, ता. हवेली) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या महितीनुसार, अनिल राठोड हे उरुळी कांचन येथे राहण्यास आहे. ग्रामपंचायत हद्दीतील दत्तवाडी परिसरात मागील पाच वर्षापासुन पाणीपुरीचा व्यवसाय करतात. शनिवारी रोजच्या प्रमाणे राठोड हे पाणीपुरी विक्री करीत होते. यावेळी एका दुचाकीवर तिघेजण आले. त्यातील तरंगे पुर्ण नाव माहीत नाही याच्याशी राठोड यांची तोंड ओळख होती. त्या तिघांनी पाणीपुरी खाल्ली व तेथुन निघुन जात होते. तेंव्हा राठोड यांनी आवाज देवुन म्हणाले की, भैया आपने पैसे नही दिये. यावर त्या तिघांपैकी पिवळा शर्ट घातलेला तरुण म्हणाला, तु मुझे पेहचानता नही क्या..? मेरा नाम आप्पा लोंढे है मै यहा का भाई हैं बाद मे अगर कभी पैसे मांगेगा तो तुझे जान से मार दूंगा.. असे म्हणाला
यावेळी तरंगे याने राठोड यांना शिवीगाळ करून हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. तसेच पिवळा शर्ट घातलेल्या इसमाने पडलेला लाकडी बांबु राठोडच्या डोक्यात मारला. त्यावेळी राठोड खाली पडले. तरंगे याने देखील तेथे पडलेला लाकडी बांबुने उजवे हातावर, डोक्यावर, तोंडावर व पायावर मारुन जखमी केले. यावर पिवळ्या शर्ट घातलेल्या तरुणाने पाणीपुरीच्या गाडीच्या गल्यामध्ये हात घालून त्यातील पैसे काढुन घेतले. त्यांना अडवत असताणा त्या तिघांनी पाणीपुरीच्या गाड्याची बांबुनी तोडफोड करुन नुकसान केले.
दरम्यान, उरुळी कांचन येथील पोलीस चौकीत तक्रार देण्यासाठी आले असता मारहाण करणाऱ्या इसमांची नावे वैभव तरंगे, तुषार अनिल अडागळे, प्रताप बाळु लोंढे अशी आहेत असे समजले. यावरून लोणी काळभोर पोलीस ठाण्यात तिघांच्याविरोधात दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल केला आहे.