गणेश सूळ
Daund News : केडगाव : सगळ्याच विषयात 35 गुण मिळवत 35 टक्क्यांवर पास होण्याची किमया दौंड तालुक्यातील नाथचीवाडी गावातील माऊली गणेश गडधे या विध्यार्द्याने करून दाखविली आहे. भैवनाथ माध्यमिक विद्यालय खुटबाव या विद्यालयातील माऊली गणेश गडधे याने मराठी , हिंदी, इंग्रजी, गणित, विज्ञान, आणि सामाजिक शास्त्र अशा सर्वच विषयात 35 गुण मिळवत टक्केवारी ही 35 टक्के एवढीच मिळवली. (35 marks in all subjects in 10th)
दिवसभर गॅरेजमध्ये काम करून केला अभ्यास
पराक्रमी माऊली दिवसभर टू व्हीलर च्या गॅरेज मध्ये काम करून सायंकाळी घरी आल्यावर दहावीचा अभ्यास करत असे. घरची परिस्थिती अत्यंत हालाखीची व बेताची असल्याने माऊली आपल्या वडिलांच्या वेल्डिंग व पक्चर च्या दुकानातही हातभार लावत असे. (Daund News) माऊली शी बोलताना त्याने खूप शिकून मोठे होण्याचे स्वप्न उराशी बाळगले आहे. तो म्हणाला की मी पास झाल्याने आनंद झाला आहे. आमची बेताची परस्थिती असल्याने आई ,वडील आणि मी जेव्हा दिवसभर राबतो तेव्हा आमचा उदरनिर्वाह चालतो. त्यामुळे मी यातच समाधानी आहे. दहावीत सर्व विषयात 35 गुण व टक्केवारी देखील 35 टक्के मिळवायला पण लक लागतो. मी भविष्यात आयटीआय शिक्षण घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आई वडील देखील कायम स्वरुपी माऊलीच्या पाठीशी आहोत असे बोलले. माऊली हा अत्यंत खडतर परस्थितित पास झालाय आणि तो नेहमी सकारात्मक विचार करत असतो त्यामुळे आम्हाला मार्क चे काही वाटत नाही. (Daund News) त्याला दहावीत 35 गुण मिळाले असले तरी तो आयटीआय ला अजून अभ्यास करून मेहनितेने चांगले मार्क मिळवेल त्याच्या सुख दुःखत आम्ही मदत करू अशी प्रतिक्रिया त्याच्या आई वडिलांनी केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : खुटबाव येथे राज्याभिषेक सोहळा मोठ्या उत्साहात साजरा
Daund News : दौंड तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव प्रयत्न करणार; माजी आमदार रमेश थोरात