युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : चक्रिवादळाच्या परिणामाने मान्सून लांबणीवर जात असल्याचे चित्र आहे. त्यामुळे सध्या उन्हाच्या वाढत्या तीव्रतेने लोकांच्या आरोग्यावर परिणाम होऊन थकवा व शरीरातील पाणी कमी होण्याचा त्रास जाणवू लागला आहे. त्यापासून बचाव करण्यासाठी वेळीच काळजी घेण्याचे आवाहन जांबूत ( ता. शिरूर ) येथील डॅा. शिवाजी जगताप व डॅा. जयश्री जगताप यांनी केले आहे. (Take care of health in the growing sun; Doctor’s advice to citizens)
शिरूर तालुक्याच्या बेट भागात काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचा पाऊस पडला आहे. मात्र मान्सुनपुर्व पाऊस ज्या पद्धतीने पडण्याची गरज आहे. तसा पाऊस अद्यापही झाला नाही. त्यामुळे मशागतीला जोमाने लागणारे शेतकरी आभाळाकडे डोळे लावून आहेत. (Shirur News) या दरम्याने उन्हाची तिव्रता अधिक वाढताना दिसू लागली आहे. या काळात उष्णाघातापासून बचाव करण्यासाठी औषधोपचार व वैद्यकिय मार्गदर्शन मिळणे अपेक्षीत आहे. त्याप्रमाणे नागरिकांनी आरोग्याच्या बचावासाठी योग्य डॅाक्टरांचा सल्ला घ्यावा.
उन्हात शारीरिक कष्टाची कामे टाळा
उन्हाचा त्रास झालेल्या रूग्णांमध्ये आढळणारी उष्माघाताची प्रमुख लक्षणे समजून घ्यावीत. शरीरातील पाणि कमी होणे, थकवा येणे, चेहऱ्याला व त्वचेला खास सुटणे, त्वचा लाल होणे, पुरळ उठणे, नाकातून रक्त येणे, डोकेदुखी ताप येणे, भूक न लागणे, चक्कर येणे, निरूत्साह, रक्तदाब कमी होणे, बेशुद्ध होणे. आदी समस्या जाणवू लागतात. यासाठी डोक्यावर टोपी, रूमाल, अथवा छत्री वापरावी. सहसा दुपारच्या काळात घरात रहावे. पुरेसे पाणि प्या, ताक, लिंबू पाणी, नारळ पाणी घ्यावे. (Shirur News) रूग्णाला हवेशिर खोलीत ठेवावे. त्याच्या भोवती गर्दी टाळावी. उन्हात शाररिक कष्टाची कामे टाळा, भर उन्हात घराबाहेर जाण्याचे टाळा, चप्पल न घालता अनवाणी उन्हात चालू नये. दुपारी स्वयंपाक करण्याचा टाळा, लहान मुलांना आणि पाळीव प्राण्यांना बंद खोलित अथवा गाडीत बंद करू नये. मद्य, चहा, कॅाफी, खूप साखर असलेली आणि कार्बोनेटेड द्रव्याचे सेवन टाळावे. उष्माघाताचा परिणाम जाणवू लागल्यास त्वरीत दवाखाना अथवा डॅाक्टरांचा सल्ला घेण्याचे आवाहन जगताप यांनी केले आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गजबज वाढली