Pune News : पुणे : शहरात गेल्या चार पाच दिवसांमध्ये बलात्काराच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. अशातच पुन्हा एकदा पुण्यातील घोरपडी परिसरातून सामुहिक बलात्काराची घटना समोर आली आहे. सार्वजनिक शौचालयात जात असताना एकाअल्पवयीन मुलीला जबरदस्तीने अडगळीच्या खोलीत नेऊन तिच्यावर सामुहिक बलात्कार करण्याचा प्रयत्न तिघांनी केला. 14 वर्षाच्या मुलीने धाडसाने त्यांच्या तावडीतून सुटका करून घेत प्रसंग टाळला आहे. हा प्रकार घोरपडी येथील पंचशीलनगर येथे सोमवारी मध्यरात्री साडेबारा ते एकच्या दरम्यान घडला आहे. (Shocking! Attempted rape of minor girl in Ghorpadi; A case has been registered against three)
घोरपडी, पंचशीलनगर येथील घटना
याप्रकरणी 14 वर्षीय मुलीने मुंढवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. त्यावरून वा पोलीसांनी तिघांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. (Pune News) समीर शेख (रा. पंचशीलनगर, घोरपडी), कार्तिक (रा. घोरपडी) आणि मुचा अशी गुन्हा दाखल झालेल्या या आरोपींची नावे आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, पिडीत मुलगी सार्वजनिक शौचालयामध्ये शौचाकरीता रात्री साडे बाराच्या सुमारास जात होती. त्यादरम्यान रेल्वे पटरीच्यामध्ये उभी राहून ती मोबाईल बघत होती. (Pune News) त्यावेळी तिघे जण आले. त्यांनी तिचा मोबाईल जबरदस्तीने घेतला. तिने मोबाईल परत मागितला. तेव्हा त्यांनी तिला मारहाण करुन जवळच्या अडगळीच्या खोलीत नेले. तेथे तिच्यावर जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा तिने त्याला विरोध करुन त्यांच्या तावडीतून सुटका करुन घेतली. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांच्या नावे पुन्हा बनावट फेसबूक अकाऊंट