Pune News : पुणे : नांदेड जिल्ह्यातील बोंढार येथे भीमजयंती साजरी करण्यासाठी पुढाकार घेणाऱ्या अक्षय भालेराव या कार्यकर्त्याची जातीय द्वेषातून हत्या करणाऱ्या गावगुंड गुन्हेगारांना आणि इतर मोकाट आरोपीना अटक करून कडक शासन करावे,त्यासाठी विशेष सरकारी वकील नेमून फास्ट ट्रॅक कोर्टात हा खटला चालवावा,अशी मागणी ‘लोकजनशक्ती पार्टी (रामविलास)’ या पक्षाच्या पुणे शहर-जिल्हा शाखेने पुण्याचे जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांना निवेदन देऊन केली आहे. (Demand for strict punishment for the perpetrators of the Akshay Bhalerao murder case; Statement of ‘Lokjan Shakti Party’ to District Collector)
फास्ट ट्रॅक कोर्टात खटला चालविण्याची मागणी
पक्षाचे पुणे शहर-जिल्हा प्रमुख संजय आल्हाट,के.सी.पवार, सचिन अहिरे, रंजित सोनावळी, सचिन फुलपगार यांनी हे निवेदन ६ जून रोजी दिले. वंचित बहुजन आघाडीच्या अक्षय भालेराव यांनी रीतसर शासकीय परवानगी घेऊन शांततेत भीमजयंती साजरी केली.(Pune News) जातीयवादी गुंडानी संधी साधून भालेराव यांची हत्या केली. ही घटना संतापजनक असून या आरोपीना फाशीची शिक्षा देण्यात यावी,अशी मागणी या पत्रकात करण्यात आली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : गोळीबाराने पुणे हादरले! महंमदवाडीत पूर्ववैमनस्यातून सराईत गुन्हेगारावर गोळीबार