हनुमंत चिकणे
Loni Kalbhor News : लोणी काळभोर (पुणे) : लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या महिला गावकामगार तलाठ्याच्या कामकाजाबाबत वरीष्ठ कार्यालयाकडे गंभीर तक्रारी होऊ लागल्याने, लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या महिला तलाठी पदाच्या पद्मिनी मोरे यांची उचलबांगडी करण्यात आली आहे. (Loni Kalbhor News)
दरम्यान पद्मिनी मोरे यांची उचलबांगडी करतानाच, लोणी काळभोर व कदमवाकवस्तीच्या तलाठीपदाचा तात्पुरचा पदभार शिंदवने-वळतीचे विद्यमान गाव कामगार तलाठी प्रदीप जवळकर यांच्याकडे. देण्यात आल्याची माहिती हवेलीच्या निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे यांनी दिली आहे. या वृत्तास हवेलीचे तहसीलदार किरण सुरवसे यांनीही दुजोरा दिला आहे. (Loni Kalbhor News)
लोणी काळभोरच्या गावकामगार तलाठी मोरे यांच्याबाबत मागील कांही दिवसापासुन नागरिकांच्या तक्रारी वाढल्या होत्या. एसआरओ कार्यालयातून आलेल्या ई म्युटेशनच्या फेरफाराची नोटीस भरायलाही विलंबाचा स्पीड ब्रेकर येत होता. तर नागरिकांना छोट्या-छोट्या कामासाठी वेठीस धरण्याचा प्रकार होऊ लागल्याच्या तक्रारी वाढल्या होत्या. (Loni Kalbhor News)
दरम्यान, पद्मिनी मोरे यांचे पती, तलाठी कार्यालयात बेकायदा थांबुन, मोरे यांच्याकडे येणाऱ्या महसूली कामासाठी वसुली करत असल्याच्या चर्चाही वरिष्ठ अधिका-यांपर्यंत पोहोचल्या होत्या.
याबाबत हवेलीच्या निवासी नायब तहसीलदार स्वाती नरुटे म्हणाल्या, “वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निर्देशांनुसार लोणी काळभोरच्या अतिरिक्त तलाठी पद्मिनी मोरे यांचा पदभार काढून घेऊन तो शिंदवणे वळतीचे तलाठी प्रदीप जवळकर यांच्याकडे देण्यात आला आहे.”