दीपक खिलारे
Indapur News : इंदापूर : राज्याचे उपमुख्यमंत्री व गृह मंत्री देवेंद्रजी फडणवीस यांनी तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये मंजूर केलेले नीरा नरसिंहपूर पोलीस स्टेशनच्या इमारतीचे खासदार सुप्रिया सुळे यांनी नियम डावलून अचानकपणे सोमवारी दि. 5 जून केलेल्या उद्घाटनाची घटना अतिशय निषेधार्थ आहे. कोणताही अधिकार नसताना खा. सुळे यांनी केलेल्या पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनाचा भाजपच्या वतीने आंम्ही तीव्र शब्दात निषेध व्यक्त करतॊ, अशी प्रतिक्रिया इंदापूर तालुका भाजपचे अध्यक्ष अँड.शरद जामदार यांनी दिली. (MP Supriya Sulen inaugurated Nira Narsinghpur Police Station building by breaking the rules: Ad. Jamdar)
उद्घाटनाचा भाजपकडून तीव्र निषेध
श्री क्षेत्र नीरा नरसिंगहपूर हे भाजपचे नेते व उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांचे कुलदैवत असल्याने त्यांनी विशेष बाब म्हणून निरा नरसिंहपूर येथे पोलीस स्टेशन मंजूर करून, त्यासाठी लागणाऱ्या इमारत बांधकामासाठी रु. 1 कोटी 43 लाख निधी मंजूर केला. (Indapur News ) यासाठी भाजप नेते व माजी मंत्री हर्षवर्धन पाटील यांनीही पाठपुरावा केला. सध्या ना. देवेंद्र फडणवीस हेच गृहमंत्री आहेत. पोलीस स्टेशनच्या इमारतीच्या उद्घाटनाचे अधिकार फक्त राज्य शासनाला व गृह खात्यास आहेत. असे असताना सर्व प्रोटोकॉल व नियम बाजूला ठेवून खा. सुप्रिया सुळे यांनी बेकायदेशीरपणे केलेले इमारतीचे उद्घाटन कायदा मोडणारे आहे.
सदर कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून आ.दत्तात्रय भरणे हे उपस्थित होते. खा. सुळे यांच्यासारख्या सुसंस्कृत खासदाराला श्रेय घेण्यासाठी बेकायदेशीरपणे उद्घाटन करणे शोभत नाही. खा.सुळे यांना पोलीस स्टेशन इमारतीच्या उद्घाटनाचा अजिबात अधिकार नाही अथवा त्यांचा संबंधच येत नाही.(Indapur News ) या उद्घाटनाची माहिती शासनास अथवा इंदापूरचे पोलीसांनाही नव्हती, गुपचूपपणे कोनशीला लावून हे उद्घाटन उरकण्यात आले आहे. त्यामुळे खा. सुप्रिया सुळे व आ. दत्तात्रय भरणे यांनी बेकादेशीपणे केलेल्या उद्घाटनाचा भाजपच्या वतीने तीव्र शब्दात निषेध करण्यात येत आहे, असे अँड. शरद जामदार यांनी सांगितले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Indapur News : इंदापूरच्या फुले माध्यमिक आश्रमशाळेचा दहावीचा निकाल ७६.९२ टक्के
Indapur News : ‘ती’ जागा इंदापूर तालुका चॅरिटेबल ट्रस्टची – मेघ:शाम पाटील