Baramati News : बारामती(डोर्लेवाडी) : बारामती कसबा परिसरातील साठे नगर या ठिकाणी 65 वर्षाच्या जुन्या वखारीला मध्यरात्री दीडच्या सुमारास अचानक आग लागल्याची घटना समोर आली आहे. आगीचे लोट मोठ्या प्रमाणामध्ये उसळलेले होते. (In Baramati, the old Vakhar was burnt in the fire; The fire was brought under control after the arrival of the fire engine, the damage was more than 70 lakhs)
एमआयडीसी अग्निशमन दलाची गाडी आल्यानंतर आग नियंत्रणात आली. मात्र आग विजेपर्यत वखारीला लागलेल्या आगीत पूर्णपणे साहित्य जळून खाक झाले होते..(Baramati News) वखारीत लाकूड, दरवाजे आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. भारत रतनसिंग पटेल ( रा. कसबा साठेनगर बारामती ) असे वखार मालकाचे नाव आहे.
या आगीत शेजारी असलेल्या इमारतीच्या खिडक्यांच्या काचांना देखील तडे गेले आहेत. आग लागल्याची माहिती वखार मालक आणि स्थानिकांनी बारामती नगरपालिकेच्या अग्निशमन नियंत्रणाला दिली. मात्र गाडी त्या ठिकाणी उशिरा पोहोचली, यामुळे आग नियंत्रणात आली नाही, (Baramati News) असे वखार मालक व स्थानिकांनी सांगितले.
बारामतीच्या नगरपालिकेची हलगर्जी
बारामतीत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या माध्यमातून बारामती नगरपालिकेला अत्याधुनिक अग्निशमन यंत्रणा कक्ष स्थापन करण्यात आला आहे. आज लागलेली आग विझवण्यासाठी दोन गाड्या आल्या होत्या त्यापैकी एक गाडी ना दुरुस्त असल्यामुळे समोर आले यामुळे एक गाडी बाजूलाच उभा करावी लागली यात बारामतीच्या नगरपालिकेचा हलगर्जीपणा समोर आला आहे. (Baramati News) यामुळे बारामतीत असलेल्या अत्याधुनिक अग्निशमनियंत्रचा उपयोग काय असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
“मध्ये रात्री दीडच्या सुमारास अचानक वखारीला आग लागली ही आग शॉर्टसर्किटमुळे लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे या आगीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे यात जवळपास 70 लाख रुपयाचे नुकसान झाले आहे. यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लाकूड बनवलेले दरवाजे खिडक्या आणि इतर साहित्य जळून खाक झाले आहे. (Baramati News) नगरपालिकेची अग्निशमन गाडी वेळेत न पोचल्यामुळेच ही आग नियंत्रणात आली नाही असा आरोप माझा आहे आग विझवण्यासाठी एमआयडीसीतील अग्निशमन जवानांचे तसेच साठे नगर मधील तरुणांनी आपला जीव मुठीत धरून आग विझवण्याचे शर्तीचे प्रयत्न केले त्यांचे मी आभार मानतो त्यांच्यामुळे इतर व कार्यातील लाकूड थोडेफार वाचले आहे.”
– भारत रतनसिंग पटेल ( वखार मालक )
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Baramati News : बारामतीत कार आणि बाईकच्या अपघातात २६ वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू