युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : कवठे येमाई ( ता. शिरूर ) येथील न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स च्या फेब्रु/मार्च एस.एस.सी 2023 परीक्षेचा विद्यालयाचा निकाल 94.79 टक्के लागला असल्याची माहिती प्राचार्य चंद्रकांत वाव्हळ यांनी दिली. (Kawathe Yemai New English School Result 94.79 percent)
या विद्यालयातून दहावीसाठी विद्यार्थी मलठण येथील न्यू इंग्लिश स्कूल मध्ये परिक्षार्थी म्हणून जात असतात. यावेळी देखील फेब्रु/मार्च एस.एस.सी 2023 दहावीची परीक्षा कडेकोट बंदोबस्तात पार पडली.(Shirur News) याकाळात पोलिसांनी बंदोबस्त ठेवून विद्यालयाभोवती दुचाकी वाहन घेऊन फिरणाऱ्या विद्यार्थ्यांवर कारवाई केली होती. त्यामुळे परीक्षा अगदी कडक वातावरणात पार पडली.
९१ विद्यार्थी उत्तीर्ण
कवठे येमाई येथी न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स विद्यालयातून ९६ विद्यार्थी परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ९१ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. (Shirur News) ५ विदयार्थी अनुत्तिर्ण झाले आहेत. नुकताच दहावीचा निकाल लागला असून यामध्ये प्रथम तीन विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत.
१) कु.सानिया वजीर पिंजारी 92.60%
२) आनप चैतन्य भानुदास . 91.40%
3) देशमाने भागवत दत्तात्रय 90.00%
या विद्यार्थ्यांचे पंचायत समिती सदस्य सुभाष पोकळे, सरपंच संगिता पोकळे, माजी सरपंच मंगल रामदास सांडभोर, रितेश शहा, दिपक रत्नपारखी, अर्जून सांडभोर,गुलाब वागदरे, बाजीराव उघडे, बाळासाहेब डांगे यांनी सर्व शिक्षकांचे अभिनंदन केले आहे.
अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांनी पुन्हा परीक्षेसाठी तयारी करून खचून न जाता परीक्षेला सामोरे जावे. त्या पाठोपाठ शिक्षणातील स्पर्धा पाहून पुढील योग्य शिक्षणाकरीता विद्यार्थ्यांनी योग्य सल्ला घेऊन निर्णय घ्या. सर्व विद्यार्थ्यांना पुढिल शिक्षणाच्या वाटचालीस शुभेच्छा.
चंद्रकात वाव्हळ, प्राचार्य, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेज ऑफ आर्ट्स कवठे येमाई
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : जांबूत येथील जय मल्हार हायस्कूलचे दहावीत १२८ विद्यार्थी उत्तीर्ण; ९९.२२ टक्के निकाल