Uruli Kanchan News : उरुळी कांचन, (पुणे) : येथील महात्मा गांधी सर्वोदय संघाचे महात्मा गांधी विद्यालय उरुळी कांचन येथील विद्यालयाचा इयत्ता दहावीचा निकाल ९८.८६ टक्के लागल्याची माहिती विद्यालयाचे प्राचार्य भारत भोसले यांनी दिली. (98.96 percent result of Mahatma Gandhi Vidyalaya in Uruli Kanchan; Shrushti Shelar first and Purva Thorat second..)
८६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल आज शुक्रवारी (ता. ०२) दुपारी १ वाजण्याच्या सुमारास ऑनलाईन पद्धतीने जाहीर झाला. (Uruli Kanchan News : ) विद्यालयातील ४४२ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यातील ४३७ विद्यार्थी पास झाले आहेत. उत्तीर्णांमध्ये ८६ विद्यार्थ्यांनी विशेष प्राविण्य मिळविले आहे.
यामध्ये विद्यालयातील प्रथम पाच आलेले विद्यार्थी
प्रथम श्रुष्टी सतीश शेलार, ९४.६० टक्के, द्वितीय पूर्वा जगदीश थोरात, ९४ टक्के, तृतीय समृद्धी शरद जाधव ९३.४० टक्के, चतुर्थ तेजस्विनी रामचंद्र ओव्हाळ, व आरती विठ्ठल गोसावी ९१.२० टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाले आहेत.
दरम्यान, विद्यार्थांना मार्गदर्शन करणारे प्राचार्य भारत भोसले, सर्व पर्यवेक्षक व सर्व अध्यापक संस्थेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, तसेच प्रा. के. डी. बापू कांचन विश्वस्त सचिव सोपान कांचन,(Uruli Kanchan News : ) राजाराम कांचन, व सर्व विश्वस्तांनी अभिनंदन केले. व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :