युनूस तांबोळी
Shirur News : शिरूर : दप्तराच ओझ अन हाप चड्डी, हाफ शर्ट अन डोक्यावर टोपी असलेल्या विद्यार्थ्याचा पेहराव बदलला होता. काहिंची वाढलेली दाढी, अन मिशांच्या आकड्यात बदललेला चेहरा पण काही जण तर अधिकारी होऊनही पुन्हा फळ्यासमोर त्याच डेस्क बॅंच बसले होते. (Prabhu Vidyadham Prashala in Wadegwan, after 40 years, the school is filled again with former students of class 10.)
शिक्षकांचा सन्मान अन; गहिवरेले शिक्षक व विद्यार्थी
दहावीत एकत्रीत शिकताना झालेल्या गंमती अन चाळीसीच्या उंबरठ्यावर प्रपंचाचा आलेला अनुभव पाठिशी घेऊन पुन्हा श्री गणेशा गिरवायचा का? असा सवाल करत मनोदयातून काहिंनी अश्रुंना वाट मोकळी करून दिली. शिक्षकांचे औक्षण करून सन्मान केल्यावर त्यांना ही गुरू दक्षिणा मिळाल्याने त्यांना ही गहिवरून आले होते.(Shirur News)
चाळीस वर्षानंतर दहावीच्या विद्यार्थ्यांचा स्नेहसंमेलनाचा सोहळा मात्र चांगलाच रंगलेला पहावयास मिळाला.
वाडेगव्हाण ( ता. श्रीगोंदा ) येथे प्रभु विद्याधाम प्रशालेत १९८४ च्या दहावीच्या बॅच हा स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आला होता. (Shirur News) कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मुख्याध्यापक संभाजीराव दैठणकर होते.
प्रत्येक विद्यार्थ्यांची ओळख करुन देताना शेती करत असलेले विद्यार्थी अडखळत आपली ओळख करून देत असताना त्यांना जाणीव झाली. लगेच त्यांनी आजही त्याच जोशात शेती करत असलेल्या विद्यार्थ्यांशी चर्चा केली. शेतीला कोणीही कमी समजु नका. (Shirur News) शेती करायला भविष्यात जमीन मिळणार नाही. याची जाणीव असू द्या. नोकरी नाही मिळाली म्हणून शेती करतात असे नाही तर अलीकडे मोठी नोकरी सोडून उत्कृष्ट शेती करणारे शेतकरी म्हणून मिरवणारे मी पहात आहे. त्यामुळे शेती करणाऱ्यांनी स्वतःला कमी समजु नये. असेही दैठणकर यांनी सांगितले.
दरम्यान, पुणे ग्रामीण पोलीस दलाच्या गुन्हे अन्वेषण विभागात अधिक्षक ( डीवाय एसपी ) या पदावर कार्यरत असणारे अशोक शेळके यांनी अनेक चोरी, दरोडे तसेच वेगवेगळ्या गुन्ह्याचा शोध लावला. त्यामुळे या सर्व विद्यार्थ्यांनी त्यांचा सत्कार केला. (Shirur News) यावेळी शिक्षणाधिकारी मनोहर वीर, लालासाहेब गावडे, सतीश गायकवाड, संभाजीराव सोनवणे, खणसे त्यावेळचे इयत्ता १० वी.चे एकूण ५५ विद्यार्थी-विद्यार्थीनी हजर होते.
यावेळी बोलताना शेळके म्हणाले की, आपन सर्वचजण त्या काळातील परिस्थीतीत शैक्षणिक साधनाच्या कमतरेतही शिक्षण पुर्ण केले आहे. प्रत्येकाला जरी (Shirur News) योग्य ती कामगिरी करून अधिकारी होता आले नाही. पण सामाजीक कार्य, शेती अशा अनेक विविध विभागात आपन सर्वजण यशस्वी झालो आहोत. यासाठी भविष्यात गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षणाला मदत करा. जनतेच्या योग्य अडचणी ओळखून पुढाकार घ्या.
या स्नेहसंम्मेलनाचे नियोजन शामशुद्दीन शेख, उदय शेळके, संजय खंदारे, पोपट यादव, संजय शेळके, पंढरीनाथ आवारी. शारदा शेळके – जाधव यांनी विश्वकांती रिसाँर्ट वाडेगव्हाण येथे केले होते. शारदा शेळके, स्वाती सेकटकर यांनी मनोदय व्यक्त करताना सर्वांना अश्रु अनावर झाले.(Shirur News)
दरम्यान, ४० वर्षांनी भेटल्यामुळे सर्व च प्रत्येकाशी आत्मयतिने, आपुलकिने चौकशी करत समाधानी होत होते.
या कार्यक्रमात संजय शेळके यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Shirur News : धरण, कालवे, बंधारे यांचे रक्षण करा; शेतीसाठी दुष्काळात मुख्य साधन