Manchar News : मंचर, (पुणे) : घोडनदी काठावर कपडे धुण्यासाठी गेलेल्या दोन सख्ख्या बहिणीचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला झाल्याची घटना एकलहरे (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत घडली आहे. (Birthday plans come to life..! The unfortunate death of two sisters from Mumbai who went to wash clothes by drowning; Incidents in Pune district..)
आरती श्याम खंडागळे (वय – १८) व प्रीती शाम खंडागळे (वय १७ रा. दोघीही, मुंबई) अशी त्यांची नावे असून ही घटना सोमवारी (ता. ०१) दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास घडली आहे.
एकलहरे गावच्या हद्दीतील घटना
मिळालेल्या माहितीनुसार, वाढदिवस असल्याने आरती व प्रीती या बहिणी मुंबई येथून एकलहरे येथे आल्या होत्या. रात्री वाढदिवसाचा कार्यक्रम पार पडला. (Manchar News )त्यानंतर सकाळी कपडे धुण्यासाठी घोडनदीवर पाचजणी गेल्या होत्या. घोडनदीवर एकलहरे गावच्या हद्दीतील नवीन पुलाजवळ आरती शाम खंडागळे, प्रीती श्याम खंडागळे, कावेरी बाबासाहेब आरझेंडे, वर्षा नारायण घोरपडे, कुशा नारायण घोरपडे हे सर्वजण कपडे धुत होते.
यावेळी कावेरी आरझेंडे हिचा पाय सटकून ती घोडनदीच्या पाण्यात पडली व बुडू लागली. तिला वाचवण्यासाठी आरती शाम खंडागळे व प्रीती श्याम खंडागळे या पाण्यात उतरल्या. मात्र खोल पाण्याचा अंदाज न आल्याने त्यांचा पाण्यात बुडून दुर्दैवी मृत्यू झाला आहे. (Manchar News ) यादरम्यान पाय घसरून पडलेली कावेरी बाबासाहेब आरझेंडे ही बारा वर्षाची मुलगी वाचली आहे. कुशा नारायण घोरपडे या सुद्धा मुलींना वाचवण्यासाठी पाण्यात उतरल्या होत्या. मात्र नाकात तोंडात पाणी जाऊ लागल्याने त्या पुन्हा माघारी फिरल्या. .
दरम्यान, यावेळी तेथे असलेल्या महिलांनी आरडाओरडा केला. यावेळी स्थानिक नागरिकांच्या मदतीने त्यांना तातडीने पाण्यातून दोन्ही मुलींना बाहेर काढून रुग्णवाहिकेतून मंचर उपजिल्हा रुग्णालयात पाठविले. मात्र, डॉक्टरांनी त्या दोघी उपचारापूर्वीच मयत झाल्याचे घोषित केले. (Manchar News ) या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :