हनुमंत चिकणे
Breaking News : उरुळी कांचन : उरुळी कांचन परिसरात अंमली पदार्थांची विक्री करणार्यासाठी आलेल्या एका तस्कराला अंमली पदार्थ विरोधी पथकाने कोरेगाव मूळ (ता. हवेली) ग्रामपंचायत हद्दीतील प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पीटलच्या शेजारी असलेल्या बस स्टॉपवरून अटक केली आहे. तस्कराकडून तब्बल ३६ लाख रुपये किंमतीचे मेफेड्रॉन ड्रग्स पोलिसांनी जप्त केले आहे. (Drugs worth 36 lakhs were seized by the anti-narcotics team at Koregaon Mool; Smuggler arrested from Uruli Kanchan)
जितेंद्र सतीशकुमार दुवा (वय-४०, सध्या रा. ड्रीम्स निवारा सोसायटी, ऊरळीकांचन, पुणे मुळ रा. दिल्ली) असे अटक केलेल्याचे नाव आहे.
बसस्टॉपवर खुलेआम सुरू होती विक्री…
वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ चे पथक लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गस्त घालत असताना, (Breaking News)पथकातील पोलिस अंमलदार विशाल शिंदे आणि योगेश मोहिते यांना प्रयागधाम ट्रस्ट हॉस्पीटल शेजारी असलेल्या बस स्टॉप येथील सार्वजनिक रोडवर एक तस्कर अंमली पदार्थांची विक्री करीत असल्याची माहिती एका खबऱ्या मार्फत मिळाली होती.
मिळालेल्या माहितीच्या अनुषंगाने पोलिसांनी त्या ठिकाणी छापा टाकला तेव्हा मेफेड्रॉन ड्रग्सची खुलेआम विक्री करताना आरोपी जितेंद्र दुवा आढळून आला. त्यानंतर पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले.
दरम्यान, पोलिसांनी आरोपी जितेंद्र दुवा याला ताब्यात घेऊन झडती घेतली असता, आरोपीकडे एमडी आणि बंटा गोळ्या आढळून आल्या. (Breaking News) आरोपीकडून पोलिसांनी अंमली पदार्थासह रोख रक्कम, ३ मोबाईल फोन, वेरना कार असा एकुण ३६ लाख ४६ हजार २०० रूपयाचा ऐवज हस्तगत केला आहे.
ही कामगिरी अंमली पदार्थ विरोधी पथक क्र. १ चे वरिष्ठ पोलिस निरीक्षक विनायक गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली (Breaking News) सहायक पोलिस निरीक्षक शैलजा जानकर, विशाल शिंदे, योगेश मोहिते, मारूती पारधी, प्रविण उत्तेकर, विशाल दळवी, संदिप शिर्के, राहुल जोशी, संदेश काकडे, नितेश जाधव, सचिन माळवे, सुजित वाडेकर, मनोजकुमार साळुंके, पांडुरंग पवार, ज्ञानेश्वर घोरपडे आणि महिला पोलिस अंमलदार रेहाना शेख यांच्या पथकाने केली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
breaking News : ‘लाचेचा गुन्हाही आता मनी लॉंड्रिंग अंतर्गत मानला जाणार; सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय