Pimpri News : पिंपरी : डिलिव्हरी बॉयचा चोरी करण्याचा अनोखा फंडा पिंपरी मधून समोर आला आहे. सामानाची डिलिव्हरी घेऊन जायचा व त्यानंतर सोसायटीमध्ये गेल्यावर पाळत ठेवून त्या सायकलची चोरी करायचा त्यानंतर ही चोरीची सायकल ओएलएक्सवर विक्री करायचा. दरम्यान या चोरट्यास पोलीसांनी सापडा रचून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून चोरीच्या ८५ हजार रुपये किंमतीच्या सहा महागड्या सायकली जप्त केल्या आहेत. (He used to come for delivery and steal the bicycles)
राहुल रविंद्र पवार (वय २५, रा. काळेवाडी) असे अटक केलेल्या डिलिव्हरी बॉयचे नाव आहे. (Pimpri News) याप्रकरणी संदीप दिगंबर तांबे (वय ४३, रा.रहाटनी) यांनी वाकड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे.
ओएलएक्सवर जाहिरात देवून विकायचा सायकली
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी हा डिलिव्हरी बॉयचे काम करतो. तो एखाद्या सोसायटीमध्ये सामानाची डिलिव्हरी देण्यास जायचा व तेथील सायकलवर पाळत ठेवायचा. त्यानंतर वेळ बघून तो ती सायकल चोरायचा. तसेच चोरीची ही सायकल तो ओएलएक्स अँपवर जाहिरात देवून विकायचा. (Pimpri News) दरम्यान चोरीचा हा प्रकार लक्षात आल्यानंतर आरोपी राहुल हा सायकल विकण्यासाठी तापकीर मळा येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून त्याला ताब्यात घेतले. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pimpri News : महावितरण अधिकाऱ्यांना आमदार लांडगे यांचा दणका!
Pimpri News : चिखलीत भरधाव डंपरची सायकलला धडक; 16 वर्षीय मुलाचा मृत्यू