Pune News : पुणे : चारित्र्याच्या संशयातून पत्नीचा चाकुने गळा चिरून तिचा खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना कोंढव्यातील पिसोळी भागात घडली. (Shocking! Wife was killed due to suspicion of character)
या प्रकरणी पतीविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून तो पसार झाला आहे.
6 वर्षांपूर्वी झालं होतं लग्न
आरती रणजीत झा (26 , रा. पद्मावती मंदिराजवळ, पिसोळी, कोंढवा) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पती रणजीत उर्फ विकास झा (36 ) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत आरती झा हिचे काका राजेश रामकृपाल झा (37 ) यांनी कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.(Pune News)
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी रणजीत मूळचा बिहारचा आहे. तो मोटारीवर चालक आहे. आरती एका सराफी पेढेत कर्मचारी आहे. सहा वर्षांपूर्वी त्यांचा विवाह झाला होता. एक महिन्यांपूर्वी ते पिसोळी परिसरात राहायला आहे. रणजीत आरतीच्या चारित्र्याचा संशय घेत होता. सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास रणजीत आणि आरतीत वाद झाला. आरतीचे काका राजेश झा आणि त्यांच्या पत्नीने घरी जाऊन वाद मिटवला. मध्यरात्री गाढ झोपेत असलेल्या आरतीचा गळा रणजीतने चिरला. (Pune News) गंभीर जखमी अवस्थेतील आरती काकाच्या घरी धावत गेली. तीने दाराची बेल वाजवल्यावर ती खाली कोसळली. तीच्या काकाने पोलिसांच्या मदतीने तीला ससून रुग्णालयात दाखल केले. उपचारांपूर्वीच तिचा मृत्यू झाला होता.
या घटनेची माहिती मिळताच पोलीस उपायुक्त विक्रांत देशमुख, सहायक आयुक्त पौर्णिमा तावरे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक संतोष सोनवणे, गुन्हे शाखेचे निरीक्षक संजय मोगले, संदीप भोसले आदींनी घटनास्थळी भेट दिली. आरोपी रणजीत पत्नीचा खून करुन पसार झाला असून (Pune News) त्याचा शोध घेण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : तळेगाव दाभाडेच्या तोतया आयएएस अधिकाऱ्याला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या…
Pune News : अखेर सोलापूर-पुणे इलेक्ट्रिक बस लवकरच सुरु…! शिवशाहीप्रमाणेच तिकीट दर