लहू चव्हाण
पाचगणी : राज्याचे मुख्यमंत्री आणि महाबळेश्वर तालुक्याचे भूमिपुत्र एकनाथ शिंदे यांचे पाचगणी आणि भोसे येथे मोठ्या जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी मुख्याधिकारी गिरीश दापकेकर, प्रविण भिलारे,ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष किशोर भाई पुरोहित,व्यापारी असोसिएशन चे अध्यक्ष मेहुल पुरोहित, मंगेश उपाध्याय, राजेंद्र भगत,प्रशांत मोरे,अंकुश मालुसरे, भूषण बोधे,मोरेश्वर कासुर्डे, आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्यमंत्री शिंदे महाबळेश्वर तालुक्यातील दरे या गावी निघाले असता त्यांचा स्वागतासाठी पाचगणी व भोसे याठिकाणी शहर व परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. पाचगणी आणि परिसरातील कार्यकर्ते छ्त्रपती शिवाजी महाराज चौकात सायंकाळी 5 वाजता जमा झाले होते. मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी त्यांच्याबरोबर शंभूराजे देसाई उपस्थित होते.
दरम्यान, पाचगणी येथे बाजारपेठेत एसटी स्टँड च्या जागेवर 3 मजली वाहनतळ उभारणे या बाबतीत पाचगणी व्यापारी असोसिएशनच्या वतीने निवेदन देण्यात आले. यावेळी पाचगणी चे मुख्याधिकारी गिरीश दापकेकर यांनी नगरपालिकेने हाती घेतलेल्या ‘हर घर तिरंगा ‘ या अभियानाचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले
मुख्यमंत्री शिंदे यांचे भोसे येथे भिलार, पांगारी आणि भोसे परिसरातील ग्रामस्थांनी त्यांचे स्वागत केले यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जमलेल्या ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी भोसे येथे भिलारचे सरपंच शिवाजी भिलारे, युवानेते नितीन भिलारे ,राजेंद्र भिलारे, भोसे गावचे सरपंच अरुण गोळे, गुलाब गोळे, विशाल गोळे आदी ग्रामस्थ उपस्थित होते