Solapur News : सोलापुर : आजकाल प्री-वेडिंग फोटोशूटचा ट्रेंड लोकप्रिय होत चालला आहे. मात्र, प्री-वेडिंग फोटोशूटमुळे लग्नात फालतू खर्च वाढत जातो हे ही तितकेच खरे आहे. यासाठी आळा घालण्यासाठी मराठा समाजाने पुढाकार घेतला आहे. मराठा समाजातील मुला मुलींचे विवाह करताना प्री वेडिंग शूटिंग करू नये असा ठराव मराठा सेवा संघाच्या वतीने एकमताने घेण्यात आला आहे. येथील आयोजित मराठा वधू वर मेळाव्यात या ठरावाला सर्व समाज बांधवांनी एकमताने मान्यता दिली आहे. यासंदर्भात जिजाऊ ब्रिगेड आणि संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून जिल्हाधिकारी आणि शासनाला निवेदन देण्यात आले आहेत. (Maratha community bans pre-wedding shooting)
मराठा वधू -वर परिचय मेळाव्यात ठराव
सोलापुरात शिवस्मारक सभागृहात वधू वर परिचय मेळाव्याचे मराठा सेवा संघ प्रणित मराठा वधू वर कक्षाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते. (Solapur News) यावेळी प्रमुख अतिथी म्हणून नांदेडचे पोलीस उपअधीक्षक बाळकृष्ण हनकुडे – पाटील,जय हिंद शुगरचे चेअरमन बबुवान माने – देशमुख शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे , परिवहनचे माजी सभापती राजन जाधव, मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील, जिल्हा समन्वयक दत्तामामा मुळे जिल्हा उपाध्यक्ष जी. के. देशमुख, सदाशिव पवार , शहराध्यक्ष सूर्यकांत पाटील, संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष सोमनाथ राऊत, शहराध्यक्ष प्रकाश ननवरे , जिजाऊ ब्रिगेडच्या राज्य कार्याध्यक्ष नंदाताई शिंदे , मराठा नागरी पतसंस्थेचे व्हाईस चेअरमन प्रकाश काटोळे आदी मान्यवरांची उपस्थिती होती.
दरम्यान, परिवहन सभापती राजन जाधव यांनी आपल्या भाषणात समाजासाठी अशा वधू वर मेळाव्याची गरज आहे. (Solapur News) मात्र विवाह सोहळा जमवण्याच्या माध्यमातून होणाऱ्या दलालीला आळा बसला पाहिजे, त्यासाठी मराठा सेवा संघाने पुढाकार घ्यावा अशी अपेक्षा व्यक्त केली. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख पुरुषोत्तम बरडे यांनी देखील मार्गदर्शन केले.
जिल्हाध्यक्ष प्रशांत पाटील यांनी मुलांच्या तुलनेत मुलींची संख्या कमी होत असल्याने चिंता व्यक्त केली .आई-वडिलांनी आपल्या मुलाचा विवाह करताना कोणतीही अपेक्षा व्यक्त न करता सुसंस्कृत कर्तृत्ववान आणि संस्कारी मुलाची निवड करावी. साधेपणाने विवाह पार पाडावेत. (Solapur News) विवाह सोहळ्याप्रसंगी केली जाणारी प्री वेडिंग शूटिंगवर पाय बंद घालावा . तसा ठराव देखील या वधू वर मेळाव्यात केला गेला सर्व समाज बांधवांनी याला एकमताने पाठिंबा दिला.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Solapur Crime : संतापजनक ! १८ दिवसाच्या बाळाला तीन महिलांनी ३ लाखाला विकले