Pune News : पुणे : घरात मुलाच्या लग्नाचा आनंदाचा सोहळा पार पडणार होता. लग्नाची धामधुम सुरु होती. पोलिस असलेल्या बापाला मुलाचे लग्न डोळे भरु पाहायचे होते. पैपाहुण्यांना आमंत्रणं धाडली जात होती. मात्र काळाला ते मान्य नव्हते. मुलाच्या लग्नाची पत्रिका वाटतानाच बापाला काळाने हिरावून नेले. भरलेल्या घरावर दु:खाचा डोंगर कोसळला. (Father Assistant Sub-Inspector of Police dies while distributing marriage Invitation of son)
पुणे जिल्हा हळहळला! आनंदाच्या सोहळ्या आधीच कोसळला दु:खाचा डोंगर
पुणे ग्रामीण पोलीस दलातील सहाय्यक पोलीस निरीक्षक भालचंद्र शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. शिंदे यांनी मुलाच्या लग्नासाठी हक्काची १५ दिवसांपासून सुट्टी घेतली होती. (Pune News) मात्र त्या दरम्यान भालचंद्र शिंदे यांना त्रास होऊ लागला. त्यानंतर शिंदे यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मागील महिनाभरापासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. मात्र शुक्रवारी उपचारादरम्यान त्यांना हृदयविकराचा धक्का आला आणि त्यातच त्यांचा मृत्यू झाला. या घटनेने ग्रामीण पोलीस दलात शोककळा पसरली असून अचानक घडलेल्या घटनेने सर्वांनाच धक्का बसला आहे.
भालचंद्र शिंदे हे गेल्या काही वर्षांपासून पुणे जिल्ह्यातील पौड पोलीस स्टेशनमध्ये सहायक पोलस निरीक्षक या पदावर कार्यरत होते. त्यांच्या मुलाचे १६ मे रोजी लग्न होते.(Pune News) लग्न जवळ आल्याने मागील महिन्यात त्यांनी लग्नासाठी जवळपास १५ दिवसांची रजा घेतली होती. रजा घेऊन ते मुलाची लग्नपत्रिका नातेवाईकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत होते. पत्रिका वाटपादरम्यान शिंदे यांना त्रास होऊ लागला. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
रुग्णालयात उपचार सुरू असताना भालचंद्र शिंदे यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यातच त्यांची प्राणज्योत मालवली आहे. शिंदे यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला असून मित्र परिवारही दुःखात बुडाला आहे.(Pune News) शिंदे यांचा लोकांशी चांगला संपर्क होता. सर्वांशी मिळून मिसळून वागणे हा त्यांचा स्वभाव होता. सर्वांशी गोड बोलून, सर्वांवर प्रेम करणाऱ्या सहकाऱ्याला भावपूर्ण श्रद्धांजली, अशा भावना शिंदे यांच्यासोबत काम करणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांनी व्यक्त केल्या.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune News : पोलिसभरतीसाठी बनावट प्रमाणपत्रे देणारा अटकेत
Pune News : पुण्यात पोलीस असल्याचा बनाव करत तरुणीला घातला 7 लाखांचा गंडा