Wagholi | वाघोली, (पुणे) : मनात जिद्द ठेवून प्रयत्न करत राहिल्यास यश निश्चित मिळते याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे वाघोली (ता. हवेली) येथिल कोमल विठ्ठल शिंदे होय. राज्य लोकसेवा आयोगाच्या (MPSC) नुकत्याच लागलेल्या निकालात सहाय्यक राज्यकर आयुक्त म्हणून कोमलची निवड झाली आहे.
कोमलने १३ क्रमांक मिळवून उत्तीर्ण होण्याचा बहुमान मिळवला आहे. कोमल हि पहिल्या प्रयत्नात पशुसंवर्धन मंत्रालयात कक्ष अधिकारी या पदावर कार्यरत आहे. तर दुसऱ्या प्रयत्नात सहाय्यक राज्यकर आयुक्त हे पद मिळवले आहे.
कोमलचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण वाघोली येथे झाले आहे. गरीब परिस्थितीत वडिलांच्या मृत्युनंतर तिच्या आईने व भावाने तिचे शिक्षण पूर्ण केले आहे. कोमल हि राष्ट्रीय स्तरीय कबड्डी खेळाडू आहे.
दरम्यान, कोमलने मिळविलेल्या यशाबद्दल तिचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Wagholi News : वाघोलीतील शासकीय जमिनीची देखभाल महापालिका करणार ; अतिक्रमणांना पायबंद बसणार?