गणेश नारंग, दौंड
Daund News : दौंड, (पुणे) : दौंड तालुक्यात चोरीच्या घटनेत वाढ झाली असून दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीत व यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत झालेल्या दोन वेगवेगळ्या घटनेत साडे तीन लाखांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना घडली आहे. (Thieves’ rampage in Daund taluka; Jewels worth lakhs of rupees removed from Devi’s temple at Sahajpur; Meanwhile, the material belonging to the hospital in Daund worth one and a half lakhs was stolen.)
दौंड पोलिसांसमोर आव्हान
दौंड पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दौंड उपजिल्हा रुग्णालयातील १७ जम्बो ऑक्सिजन सिलेंडर, ६ ऑक्सीजन प्लोमीटर, ४० मीटर ऑक्सीजन वाहून नेणारे तांब्याचे पाईप व एक ३ एचपीची मोटर असा सुमारे १ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. (Daund News ) याबाबत दौंड उपजिल्हा रुग्णालयाचे अधिक्षक डॉक्टर अजिनाथ नामदेव खारतोडे यांनी दौंड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दुसऱ्या घटनेत यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सहजपूर (ता. दौंड) येथील मळाई माता मंदिरातील देवीच्या अंगावरील सोन्याची बोरमाळ, ठुशी, एक चांदीचा मुकुट तसेच मंदिरामध्ये देवीचे चांदीचे सहा मुखवटे असा १ लाख ७५ हजार रुपयांचा मुद्देमाल अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला आहे. (Daund News) याबाबत मळाई माता मंदिराचे पुजारी लक्ष्मण धोंडीबा गायकवाड यांनी यवत पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. तपास यवत पोलीस करीत आहेत.
दरम्यान, दौंड तालुक्यात चोऱ्यांचे प्रमाण वाढले असून पोलीस प्रशासनाने यावर वेळीच पायबंद घालण्याची गरज निर्माण झाली आहे अशी चिंता तालुक्यातील नागरिकांनी व्यक्त केली.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Daund News : दौंड तालुक्यातील कुसेगाव येथे बिबट्याचा हल्ल्यात शेळी ठार ; परिसरात भीतीचे वातावरण..
Daund Crime : दौंडमधील गोहत्या करणाऱ्या टोळीवर तडीपारीची कारवाई