पुणे : डोंगरगण (ता. शिरूर) ग्रामपंचायत हद्दीत हॉटेलमधील कामगाराचा खून करून पसार झालेल्या आरोपीला शिरूर पोलिसांनी विरार (जि. ठाणे) येथील रेल्वेस्थानक परिसरातून ताब्यात घेतले आहे.
अनंता रघुनाथ कांबळे, (रा. कोळंबे, ता. संगमेश्वर, जि. रत्नागिरी) असे खून करणाऱ्या आरोपीचे नाव आहे. तर महेश उर्फ सुनिल नामदेव सरोदे, (वय-४५, रा. दावतपुर, ता. औसा) असे खून झालेल्या व्यक्तीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी (ता. ०७) डोंगरगण ता. शिरूर ग्रामपंचायत हद्दीतील हॉटेल रानवारा येथे हॉटेल कामगार महेश सरोदे यास दुसरा हॉटेल कामगार अनंता कांबळे याला अज्ञात कारणावरून धारदार शस्त्राने त्याचे डोक्यात पायावर व गुप्तांगावर वार करून कुरपणे खुन करून फरार झाला होता.
सदर घटनेचे गांभीर्य लक्षात घेवुन शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत यांनी पोलीस ठाण्यातील गुन्हे शोध पथकाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचारी यांचे वेगवेगळे पथक तयार करून आरोपीला पकडण्याच्या सूचना दिल्या. त्यानुसार पोलिसांनी आजुबाजुचे परिसरात त्याचा गोपनीय बातमीदार तसेच तांत्रिक पध्दतीने शोध घेण्यास सुरूवात केली.
दरम्यान, सुरेशकुमार राऊत यांना गोपनीय बातमीदारामार्फत माहिती मिळाली कि, सदरचा गुन्हेगार अनंता कांबळे हा विरार, जि.ठाणे या परिसरात लपुन बसलेला आहे. त्यानुसार डी.बी. पथकातील पोलिसांनी सदर ठिकाणी शिताफीने पकडुन त्यास ताब्यात घेतले.
आरोपीला न्यायालयात हजर केले असता मंगळवार (ता. १६) पोलीस कोठडी रिमांड मंजुर केलेली आहे.
सदरची कामगिरी शिरूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुरेशकुमार राऊत, सहायक पोलीस निरीक्षक अमोल पन्हाळकर, गुन्हे शोध पथकाचे पोलीस उपनिरीक्षक अभिजीत पवार, सहायक पोलीस उपनिरीक्षक नाजिम पठाण, पोलीस नाईक धनंजय थेऊरकर, नाथसाहेब जगताप, प्रविण पिठले, विशाल पालवे, संतोष साळुंके, दिपक पवार, सुरेश नागलोत, पोलीस मित्र दिपक बढे यांनी केलेली आहे.