Pune News : पुणे : नऊ मुली बुडल्याची बातमी ताजी असताना आता पुन्हा खडकवासला धरणात एक मुलगा बुडाल्याची घटना घडली समोर आली आहे. या घटनेबाबत माहिती मिळताच घटनास्थळी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाच्या अग्निशमन दलाचे जवान दाखल झाले असून त्यांनी पाण्यात मुलाचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. हा मुलगा धरणाच्या मागच्या बाजूला कालव्यात तोंड धुण्यासाठी उतरला असताना बुडाला. (He went to wash his face in the water and disappeared in a moment; Boy drowned in Khadakwasala canal)
शाहिद अल्लाउद्दिन बरोटे (वय 16, रा. येरवडा) असे बुडालेल्या मुलाचे नाव आहे. मागील आठवड्यात याच ठिकाणी जुबेर इस्माईल शेख (वय 26, भवानी पेठ पुणे) याचा बुडून मृत्यू झाला होता. (Pune News)
अग्निशमन दलाच्या जवानांकडून शोध सुरू
मिळालेल्या माहितीनुसार, शाहिद हा त्याच्या इतर मित्रांसह सकाळी सिंहगडावर गेला होता. परत येताना ऊन असल्याने चौघेही खडकवासला धरणाच्या मागच्या बाजूला कालव्याजवळ तोंड धुण्यासाठी थांबले. (Pune News) चौघेही कालव्याच्या कडेला तोंड धूत असताना शाहिदचा पाय घसरला व तो खोल पाण्यात गेला. पाण्याला वेग असल्याने काही क्षणांतच तो दिसेनासा झाला. दरम्यान शाहिद याचा अग्निशमन दलाच्या जवानाकडून शोध घेण्यात येत आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : सिनेस्टाईल पाठलाग करत वाहन चोरट्यांना अटक; वानवडी पोलीसांची कामगिरी
Pune News : पुण्यातील चांदणी चौक घेणार मोकळा श्वास ; उड्डाणपूल जुलैअखेर सुरू होणार