Solapur Crime : सोलापूर : तीन मुलानंतर चौथा मुलगा झालेल्या मातेकडून एका नर्सिंग होममधील महिलेने संपूर्ण माहिती काढली. त्यानंतर बाळाला मेंदूचा आजार असून त्यासाठी मोठा खर्च असल्याचे सांगून बाळ सांभाळायला देण्याचा बहाणा केला. त्यानंतर मध्यस्थी तीन महिलांनी सोलापुरातील एका महिलेला तीन लाख रुपयांत बाळ विकल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. (Outrageous! 18-day-old baby sold by three women for 3 lakhs)
बाळाच्या विक्रीतून आलेले पैसे तिघींनी वाटून घेतले
बाळाच्या विक्रीतून आलेले सर्व पैसे तिघींनी आपापसांत वाटून घेतले आणि त्या चिमुकल्याच्या आईला एक रुपयादेखील दिले नाहीत.
आजारी बाळावर ओळखीच्या डॉक्टरकडून उपचार करूयात म्हणून मध्यस्थी महिलेने त्या बाळाला ताब्यात घेतले आणि विकून टाकले. (Solapur Crime) बाळ कोणाला देताय, कोणत्या दवाखान्यात उपचारासाठी ठेवले आहे, असे प्रश्न विचारल्यानंतर त्या मध्यस्थी महिलेने पैसे देण्याचे आमिष दाखवले. पण, अगोदरच त्या तीन महिलांनी ज्याला बाळ विकले, त्यांच्याकडून तीन लाख रुपये घेतले होते.
चिमुकल्याच्या आकांताने रडत आलेल्या त्या मातेच्या वेदना समजून सदर बझार पोलिस ठाण्याचे पोलिस अंमलदार रफिक इनामदार यांनी मध्यस्थी महिलेचे घर गाठले. त्यानंतर एक-एक करीत या प्रकरणात एकूण चार महिलांनी मध्यस्थी केल्याची बाब समोर आली. एकीने ८० हजार रुपये, दुसरीने २० हजार आणि तिसरीने (मुख्य सूत्रधार) दोन लाख रुपये घेतले होते. (Solapur Crime) बॉण्ड करूनही पैसेही नाहीत आणि बाळही नाही म्हणून त्या चिमुकल्याच्या आईने पोलिस ठाणे गाठले होते. दरम्यान, या प्रकरणातील मुख्य संशयित महिला आरोपीने यापूर्वी देखील असेच प्रकार केल्याची माहिती पोलिसांना मिळाली असून त्यादृष्टिने आता तपास सुरु आहे. ५० हजारांची रक्कम पोलिसांनी जप्त केली असून उर्वरित रक्कम अजून मिळालेली नाही. या प्रकरणात पोलिसांनी बाळाचे आई-वडिल, मध्यस्थी महिलांसह बाळ विकत घेणारे, अशा एकूण १० जणांविरूद्ध सदर बझार पोलिसांत गुन्हा दाखल झालेला आहे.
मेंदूचा आजार असून वेळेत उपचार केले नाहीतर बाळच्या जिवाला धोका होईल, अशी भीती दाखवून मध्यस्थी महिलेने त्या बाळाला विकण्याचा प्लॅन आखला. दोन मुली असलेल्या एका महिलेच्या आईशी संपर्क करून त्यांना त्या चिमुकल्याची विक्री केली.(Solapur Crime) मुलीला दोन मुलीच असून आता मुलगा मिळेल म्हणून तिच्या आईने दागिने मोडून तीन लाखांची जुळवाजुळव करून मध्यस्थी महिलांना दिले होते.
पण, यातील त्या चिमुकल्याला कोणताही आजार नव्हता, ही बाब पोलिस तपासात समोर आली आहे. दरम्यान, ज्या महिलेने बाळ घेतले, तिने सुरवातीला पोलिसांनी हैदराबादला दिल्याचे सांगितले होते. (Solapur Crime) पण, सायबरच्या माध्यमातून लोकेशन सोलापूरचे निघाले आणि पोलिसांनी बाळ ताब्यात घेऊन न्यायालयाच्या आदेशानुसार त्याला मातेच्या ताब्यात दिले. पोलिस तपास करीत आहेत.