Fetal Accident In Pune : पुणे : पुणे शहरातून भीषण अपघाताची माहीती समोर आली आहे. एका खासगी बसचा ब्रेक फेल झाल्याने बसने पाच ते सहा वाहनांना जोरदार धडकी दिली आहे. (Fetal Accident In Pune) या भीषण अपघातात दोन जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हा भीषण अपघात शहरातील एनआयबीएम रोडजवळील इशरत बागेजवळ झाला आहे. अपघातात अन्य् दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. (Fatal accident in Pune; The bus’s brakes failed and the vehicle blew up; two died on the spot)
आज रात्री आठ वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला आहे. (Fetal Accident In Pune) अपघाताची माहिती मिळताच अपघातस्ठळी कोंढवा पोलीसांनी धाव घेतली आहे.
बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात
या अपघाताबाबत अधिक माहिती अशी की, कोंढवा परीसरातील इशरत बाग येथून ही खासगी बस जात होती. दरम्यान चडावर अचानक बसचे ब्रेक फेल झाले. (Fetal Accident In Pune)त्यामुळे बस पाठीमागे आली. चढ मोठा असल्यामुळे बसने मागे असलेल्या पाच ते सहा वाहनांना अॅटो रिक्षा, दुचाकी आणि इतर वाहनांना उडवले. यावेळी दोघांचा जागीच मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी झाले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : पुर्ववैमनस्यातून दोघांवर तीक्ष्ण शस्त्राने वार; पुण्यातील महर्षीनगर येथील घटना
Pune accident : पुणे हळहळले!; भरधाव टिप्परची दुचाकीला धडक; भीषण अपघातात दोन मित्रांचा मृत्यू
Pune Accident : पुणे-सोलापूर महामार्गावर अपघात ; भरधाव ट्रकची कारला धडक; पुण्यातील महिला ठार