Pune Crime पुणे : पुणे शहरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. एका सेवानिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्तावर विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे. (Pune Crime) बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी आलेल्या महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सेवनिवृत्त सहाय्यक पोलीस आयुक्त हे महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचे संचालक असून या प्रकल्पाची माहितीसाठी आलेल्या महिलेसोबत हा प्रकार घडला आहे. (Pune Crime) या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे. (Exciting! A molestation case against a retired Assistant Commissioner of Police)
विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल
सुरेश भामरे असे गुन्हा दाखल झालेल्या महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचे संचालक, सेवानिवृत्त सहाय्यक पोलिस आयुक्ताचे नाव आहे.(Pune Crime) याप्रकरणी येरवड्यातील एका 44 वर्षीय महिलेने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. त्यावरून पोलीसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, लोहगाव येथे महाराष्ट्र मेगासिटी पोलीस गृहरचना संस्थेचा प्रकल्प आहे. या बांधकाम प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी महिला गुरुवारी सायंकाळी साडेचार वाजता गेली होती. (Pune Crime) त्यावेळी त्या बांधकामाचे शुटिंग करीत होत्या. तेव्हा भामरे यांनी त्यांचा मोबाईल हिसकावून घेतला. तसेच तक्रारदार महिलेचा हात पकडून फिर्यादी यांच्या गालाला स्पर्श करुन मनास लज्जा उत्पन्न होईल, असे कृत्य केले व अश्लिल शिवीगाळ केली. (Pune Crime) पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Pune Crime : जनरेटर चोरणाऱ्या तीन भामट्यास गुन्हे शाखेने केली अटक
Pune crime : शारीरीक संबंधानंतर जबरदस्तीने केला गर्भपात ; लग्नाचा विषय काढल्यावर जातीवाचक शिवीगाळ