Babaraje Deshmukh Handcuffed : पुणे : मावळमधील प्रशांत उर्फ बाबाराजे गणपतराव देशमुख (33, रा. मु.पो. बेबडओव्हळ, ता. मावळ, जि. पुणे) याला शिरगाव पोलिसांनी बेड्या ठोकल्या. बाबाराजे देशमुख याच्याविरूध्द 70 लाख रूपयांच्या खंडणीची मागणी करून 5 लाख रूपयांची खंडणी घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
70 लाखांच्या खंडणीची मागणी करत घेतले 5 लाख
याप्रकरणी वडगाव बुद्रुक येथील एका 48 वर्षीय सिव्हील इंजिनियरने शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. त्यानुसार, पोलिसांनी बाबाराजे (Babaraje Deshmukh Handcuffed) याच्याविरूध्द गुन्हा दाखल केला आहे. सदरील गुन्हा सन 2013 ते नोव्हेंबर 2020 दरम्यान वेळावेळी मावळतालुक्यातील बेबडओव्हळ येथील गट नंबर 196 मध्ये घडला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, बाबाराजे देशमुखची गट नंबर 196 मध्ये मौजे बेबडओव्हळ (ता. मावळ) येथे असणारी 5 एकर मिळकत ही वनीकरण विभागात समाविष्ट आहे. त्या मिळकतीचे प्लॉटिंग होत नाही.
याबाबत देशमुखला माहिती आहे. तरीदेखील त्याने त्या मिळकतीमधील 25 गुंठे जागेचा व्यवहार फिर्यादी सिव्हील इंजिनियरसोबत केला. त्याचा मोबदला म्हणून 25 लाख रूपये घेतले. (Babaraje Deshmukh Handcuffed) त्या जागेचे फिर्यादीच्या नावाने खरेदीखत करून न देता व घेतलेले 25 लाख रूपये फिर्यादीला परत न करता त्यांची फसवणूक केली. सदरील जागेचे खरेदीखत करावयाचे असल्यास आणखी 70 लाख रूपये द्यावे लागतील असे म्हणून त्यांच्याकडे 70 लाखाच्या खंडणीची मागणी केली. (Babaraje Deshmukh Handcuffed) पैसे न दिल्यास अथवा पोलिसांकडे तक्रार केल्यास फिर्यादीस जीवे मारण्याची धमकी दिली आणि 5 लाख रूपये खंडणी म्हणून घेतले.
शिरगाव पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी बाबाराजे देशमुख याला अटक केली आहे. गुन्हयाचा पुढील तपास पोलिस उपनिरीक्षक कांबळे करीत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Maval Crime : जन्मदात्या पित्याने केला मुलाचा खून ; मावळ तालुक्यातील सुदुंबरे येथील घटना..!