Pune News | आंबेगाव, (पुणे) : महामार्गावरच धावत्या एसटी बसची पाठीमागील दोन चाके निघून पडल्याची घटना पुणे – नाशिक महामार्गावर घडली आहे. आंबेगाव तालुक्यातील शेवाळवाडी हद्दीत मोरडे चॉकलेट कारखान्याजवळ ही घटना घडली आहे. एसटी बसचे चाकं निखळल्यामुळे बसमधील 35 प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप सहन करावा लागला.
35 प्रवाशांना मात्र नाहक मनस्ताप….
चाके निखळ्यानंतर एक चाक बसच्या पुढे आणि दुसरं चाकं रस्त्याच्या बाजूला असणाऱ्या ओढ्यात जाऊन पडले. ही बस जवळपास १५ ते २० मिनिटे चार चाकांवर धावत असल्याची माहिती समोर आली आहे. या बसमध्ये एकूण ३५ प्रवाशी होते. मात्र, चालकाने दाखवलेल्या प्रसंगावधानामुळे मोठा अपघात टळला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे – नाशिक महामार्गावर असणाऱ्या शेवळेवाडी परिसरात लालपरीची मागची दोन्ही चाके अचानक निखळली. त्यावेळी ही एसटी बस रस्त्यावर धावत होती. जवळपास १५ ते २० मिनिटे ही बस रस्त्यावर धावत होती. त्यातील एक चाक बसच्या पुढे तर एक चाक रस्त्याच्या बाजूला खोल ओढ्यात जाऊन पडले.
बसमध्ये आरडाओरड सुरू…
बस तिरकी होऊन रस्त्यावरच धावत होती. या बसमध्ये असणाऱ्या प्रवाशांमध्ये एकच खळबळ उडाली आणि बसमध्ये आरडाओरड सुरू झाली. या घटनेनं बसमधील सर्व प्रवासी धास्तावले.
दरम्यान, दोन्ही चाकं निघून गेल्यावर बस चारच चाकांवर घासत पुढे जात असल्याचे पाहायला मिळत आहे. घासत गेल्यामुळे ठिणग्या उडत होत्या. मात्र, हा प्रकार चालकाच्या वेळीच लक्षात आल्यावर त्याने प्रसंगावधान राखत सर्व प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. या प्रसंगाने एसटी बसची चाकं अचानक निखळेपर्यंत चालक आणि वाहक काय करत होते? त्यांना बस चेक करून घेता आली नाही का? असा सवाल प्रवासी नागरिकांकडून व्यक्त केला जात आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Pune News | निमगाव म्हाळुंगी परिसरातून पाच किलो गांजा जप्त ; एकाला बेड्या, तर एकजण फरार