Pune Fraud | तळेगाव, ढमढेरे, (पुणे) : शिक्रापूर (ता. शिरूर) येथे दोन वर्षांपूर्वी झालेल्या अपघातादरम्यान एका कारमालकाने पोलिसांच्या तपासात चक्क बनावट इन्शुरन्स कागदपत्रे जोडत कंपनीची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शिक्रापूर पोलिस ठाण्यात याबाबत इन्शुरन्स कंपनीच्या वतीने राहुल देवपूरकर (वय 46, रा. नवी पेठ, पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार, साहेबराव पाचुंदकर या कारमालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.मिळालेल्या माहितीनुसार,दोन वर्षांपूर्वी वाहन (क्र. एमएच 12 डीजी 0263 व एमएच 12 एलआर 5727) या दोन वाहनांचा अपघात झाला होता.
एमएच 12 डीजी 0263 या कारचे मालक साहेबराव पाचुंदकर यांनी त्यांच्या वाहनाचे द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीचे कागदपत्र पोलिस तपासात नुकसान भरपाईसाठी जमा केले होते. पोलिसांनी त्याबाबतची कार्यवाही करत न्यायालयात कागदपत्रे सादर केली.
सादर केलेली इन्शुरन्स कागदपत्रे बनावट…
त्यानंतर न्यायालयाने नुकसान भरपाईसाठी द न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे कागदपत्रे सादर केली असता, इन्शुरन्स कंपनीच्या पडताळणीमध्ये पाचुंदकर यांनी पोलिसांकडे सादर केलेली इन्शुरन्स कागदपत्रे बनावट असल्याचे समोर आले. त्यामुळे पाचुंदकर यांनी इन्शुरन्स कंपनीची फसवणूक केल्याचे निदर्शनास आल्याने कंपनीने शिक्रापूर पोलिसांत फिर्याद दिली.
पोलिस निरीक्षक प्रमोद क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक वैभव पवार तपास करत आहेत.