Suicide | पुणे : दोन दिवसापुर्वी वकिलीचे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना ताजी आसताना आज पुण्यात आणखी एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. चे शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. या विद्यार्थ्याने मृत्यूपूर्वी सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. या घटनेनंतर एकच खळबळ उडाली आहे.

विजय नांगरे असे आत्महत्या केलेल्या विद्यार्थ्याने नाव आहे.

विजय हा पुण्यातील मॉडर्न महाविद्यालयात बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. विश्रांतवाडी येथील सामाजिक न्याय विभागाच्या वसतिगृहात तो राहत होता. विश्रांतवाडी पोलीस ठाण्यात या घटनेची नोंद करण्यात आली आहे.
सुसाईड नोट लिहून ठेवली…
मिळालेल्या माहितीनुसार, पुणे शहरातील मॉडर्न महाविद्यालयात विजय हा बी. ए. च्या द्वितीय वर्षात शिकत होता. त्याने वसतिगृहाच्या पाचव्या मजल्यावरील अभ्यासिकेतील पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आत्महत्यापुर्वी विजयने एक सुसाईड नोट लिहून ठेवली आहे.
या घटनेची माहिती मिळताच तात्काळ घटनास्थळी विश्रांतवाडी पोलीसांनी धाव घेतली. दरम्यान विजय याने हे टोकाचे पाऊल का उचलले याचा तपास पोलीस सुसाईट नोटच्या माध्यमातून करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Suicide | उरुळी कांचन येथे ३५ वर्षीय तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या
Sucide : पुण्यात हुंडा न दिल्यावरून नवविवाहितेचा छळ; महिलेची राहत्या घरात आत्महत्या..!
Suicide | शिरुरमध्ये महिलेची गळफास घेऊन आत्महत्या ; कारण अस्पष्ट







