Suicide | हडपसर : शहरातील हडपसर परीसरातून धक्कादायक घटना समोर आली आहे. पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीने गळफास घेत आत्महत्या केली आहे. पत्नी व तिच्या आई-वडिलांकडून होणाऱ्या त्रासातून पतीने हे टोकाचे पाऊल उचलले आहे. या घटनेनंतर पोलीसांनी पत्नीसह तिच्या आई-वडिलांवर आत्महत्या करण्यासाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.
संतोषकुमार बाबासाहेब कोरे असे आत्महत्या केलेल्या पतीचे नाव आहे.
पत्नी रवीना संतोषकुमार कोरे (रा. वरवंड, ता. दौंड, जि. पुणे), रंजना दामोदर इरळे, दामोदर इरळे, संग्राम दामोदर इरळे, गणेश दिवेकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी संतोषकुमारची आई यशोदा बाबासाहेब कोरे (वय ५५, रा. कोळी ता. सांगोला, जि. सोलापूर) यांनी फिर्याद दिली आहे.
बँक खात्यातून पैसे काढून अपहार…
मिळालेल्या माहितीनुसार, मालमत्तेवरून संतोषकुमार यांच्या सोबत पत्नी रवीना, सासू रंजना व सासरे दामोदर हे त्रास देत होते. पत्नीसह सासरकडून होणाऱ्या हा त्रासाला कंटाळून संतोषकुमार याने गळफास घेत आत्महत्या केली. आरोपींनी संतोषकुमार यांच्या बँक खात्यातून पैसे काढून अपहार केला, तसेच त्यांच्या नावावर असलेली सदनिका आणि जागा बनावट कागदपत्रांद्वारे बळकावल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा….!
Sucide News : पत्नीसह तिच्या 3 मित्रांच्या त्रासाला कंटाळून पतीने केली आत्महत्या ; एकास अटक
Sucide : पुण्यात हुंडा न दिल्यावरून नवविवाहितेचा छळ; महिलेची राहत्या घरात आत्महत्या..!