पुणे Aware Murder Case : तळेगाव दाभाडे येथील जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे यांच्या (Aware Murder Case) हत्याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. (Aware Murder Case) आरोपींना शनिवारी वडगाव मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आले असून न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. (Aware Murder Case)
अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे
प्रविण उर्फ रघुनाथ धोत्रे, आदेश धोत्रे, शाम निगडकर (रा. तळेगाव) आणि नाना उर्फ संदीप विठ्ठल मोरे (40, रा. पंचतारामनगर, संभाजी चोक, गणेशमंदिराजवळ, आकुर्डी) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, किशोर आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला. या हल्ल्यात आवारे यांचा मृत्यू झालाय. गोळीबार करुन त्यांच्यावर कोयत्याने वार करण्यात आले होते. हल्ला झाल्यानंतर त्यांच्यावर सोमाटणे फाटा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. हल्लेखोरांनी भर दुपारी गजबजाट असलेल्या परिसरात हल्ला केल्याने सगळ्यांची एकच धावपळ उडाली होती.
पिंपरी चिंचवड पोलीसांनी खून प्रकरणी पिंपरी-चिंचवड पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले आहे. मावळ येथील न्यायालयात हजर करण्यात आसे असून न्यायालयाने आरोपींना 20 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.
दरम्यान, याप्रकरणी मावळचे राष्ट्रवादीचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सुधाकर शेळके, संदीप गराडे, श्याम निगडकर (रा. तळेगाव दाभाडे) आणि श्याम याचे तीन साथीदार यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी किशोर आवारे यांच्या आई, तळेगाव दाभाडे नगरपरिषदेच्या माजी नगराध्यक्षा सुलोचना आवारे यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
याबाबत आमदार सुनील शेळके यांनी पत्रकार परिषद घेत आपली प्रतिक्रिया दिली आहे. बदनामीसाठी आपल्याला या गुन्ह्यात गोवले असल्याचे आमदार शेळके म्हणाले आहेत. तसेच किशोर आवारे आणि आमच्यामध्ये राजकीय मतभेद होते, मात्र मतभेद नव्हते. जे काही सत्य आहे ते पोलीस चौकशीत बाहेर येईल. त्यामुळे या घटनेला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न कोणीही करू नये. घरातील व्यक्तीची हत्या झाल्यानंतर त्यांच्या कुटुंबीयाची भावना काय असते ती समजून आहे. परंतु तक्रार दाखल करण्यामागे याचे सुत्राधार कोण आहेत. याचा पुढील काळात शोध घेण्याचा प्रयत्न करू.
मावळच्या जनतेने मला विकासासाठी निवडून दिले आहे. अशा पद्धतीचे घाणेरडे राजकारण माझ्याकडून होणार नाही, राजकारणातून बाजूला होण्याचा प्रश्न असेल तर आज होईन. परंतु बदनाम करून तुम्ही मला आलिप्त करू शकत नाही. असा ईशाराची शेळके यांनी दिली आहे.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा :
Kishor Aware | जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे यांचा उपचारादरम्यान मृत्यू…