युनूस तांबोळी
Popatrao Gawde : शिरूर, (पुणे) : कोरोना काळात वैद्यकिय सेवेला अधिक महत्व प्रा्प्त झाले होते. त्यातून वैद्यकिय अधिकाऱ्यांनी, कर्मचाऱ्यांनी रूग्णांना दिलेली सेवा व विश्वासाचा आधार महत्वाचा होता. त्यामुळे वैद्यकिय व्यवसाय करत असताना आरोग्य सेवा भावना महत्वाची असून शुक्य आकारताना रू्गणांच्या परिस्थितीचा विचार करावा. वेळेत रूग्णांना आरोग्य सेवा उपलब्ध करावी. असे मत शिरूरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांनी व्यक्त केले.
कवठे येमाई येथे नवीन हॉस्पिटलचे उद्घाटन..
कवठे येमाई ( ता. शिरुर ) येथे डॉ. शुभम पोपटराव बारहाते व पुजा शुभम बारहाते यांनी सुरु केलेल्या विघ्नहर्ता हॉस्पिटलचे उद्घाटन शिरुरचे माजी आमदार पोपटराव गावडे यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष, जुन्नर तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष पांडुरंगजी पवार होते. या वेळी घोडगंगाचे माजी संचालक राजेंद्रदादा गावडे, पंचायत समिती समितीचे माजी उपसभापती बाळशिराम ढोमे, पंचायत समिती सदस्य डॉ सुभाष पोकळे, सरपंच अरुणाताई घोडे, वासुदेव जोरी,जीवन मित्र मेडीकल ट्रस्टचे अध्यक्ष डॉ हिरामण चोरे, जिल्हा कृषी अधिकारी संजय पिंगट, सेवानिवृत्त अधिकारी प्रभाकर गावडे, डॉ दत्तात्रय डुकरे, डॉ श्रीकांत फलके, डॉ संतोष उचाळे, डॉ भरत सोदक, जांबुतचे सरपंच दत्तात्रय जोरी, बाळकृष्ण कड.
तसेच बाळासाहेब बदर, बाळासाहेब फिरोदिया,बाबाशेठ फिरोदिया, बबनराव पोकळे, बाजार समितीचे माजी संचालक सावित्राशेठ थोरात, पशुवैद्यकिय अधिकारी डॉ प्रकाश उचाळे, केंद्रप्रमुख पी. सी. बारहाते, शिक्षक संघटनेचे अध्यक्ष संतोष थोपटे, शिक्षक पतसंस्थेचे माजी अध्यक्ष म्हतारबा बारहाते, विठ्ठल मुंजाळ, रामदास सांडभोर, दिपक दुडे पाटील, किरण ढोमे ,डॉ हेमंत पवार, देविदास पवार, शहाजी सोदक यांच्यासह मोठ्या प्रमाणात ग्रामस्थ उपस्थित होते . या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन लहु साबळे यांनी तर आभार डॉ. शुभम बारहाते यांनी मानले.
अधिक बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा..
Shirur News : विचार तुमचे लिखाण आमचे निसर्गातल म्हतारपण मुलांसमवेत अनोखी वयोवृद्धांची सहल
Shirur News | लोकसहभाग आणि नाम फाऊंडेशन करणार पाणीदार गाव ; ओढा खोलीकरण व ४२ तलावांची निर्मिती