Abacus | उरुळी कांचन, दि. १२ : नाशिक येथे नुकत्याच पार पडलेल्या राज्यस्तरीय अबॅकस स्पर्धेत उरुळी कांचन (ता. हवेली) येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ब्रेन मास्टर (एनआयबीएम) संस्थेचे ४९ पैकी १० विद्यार्थी विजेते झाले आहेत. तर ३२ विद्यार्थी गुणवत्ता यादीत झळकले आहेत.
यामध्ये उरुळी कांचन, लोणी काळभोर व शेवाळेवाडी येथील विद्यार्थ्यांचा समावेश आहे. अशी माहिती उरुळी कांचन येथील नॅशनल इन्स्टिटयूट ऑफ ब्रेन मास्टर (एनआयबीएम)चे अध्यक्ष नवनाथ हंबीर यांनी दिली आहे.
अबॅकस या परीक्षेसाठी राज्यभरातून ३९४ विद्यार्थीं सहभागी झाले होते. नशिक येथील रुद्र प्रॅक्टिकल स्कूल या ठिकाणी या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. विविध गटांतून ६ मिनिटात १०० गणिते सोडवून प्राविण्य मिळविले आहे. हे सर्व विद्यार्थी संस्थापक अध्यक्ष नवनाथ हंबीर यांच्या मार्गदर्शनाखाली अबॅकसचे प्रशिक्षण घेत आहेत.
या विद्यार्थ्यांना नवनाथ हंबीर, प्रशिक्षका किरण शेळके ,वैष्णवी शिंदे ,प्राची चौरे, ऋतिका कोऱ्हाळे, हेमा चाबुकस्वार, क्षितिजा ठाकूर, अक्षदा बडदे ,कीर्ती येळे, राखी सोनावणे यांनी मार्गदर्शन केले. यशस्वी विद्यार्थ्यांचे पालक, प्रशिक्षक व संस्थेच्या वतीने स्वागत करून शुभेच्छा देण्यात आल्या.
यशस्वी विद्यार्थ्यांची नावे –
* उरुळी कांचन – अंश राहुल कांचन, इनायत मुलाणी, तेजस नानासाहेब चौधरी,आरोही सुहास कांचन, समुल्लाह मुलाणी
- लोणी काळभोर – जय तानाजी काळभोर, पूर्वी राहुल नलवडे, रुद्र अनिल जाधव, सोहम आदीनाथ गुघे, जगदीश रामानंद गुंडगिरे
- शेवाळवाडी -जान्हवी सुनील गावडे, अर्णव आप्पासाहेब कलेल, अर्निका आप्पासाहेब कलेल,उत्कर्ष उमेश मोरे.